50 Hajar Anudan: नमस्कार शेतकरी मित्रांना, आपले नवीन योजना या पोर्टलवर मनापासून स्वागत आहे. आपल्या या पोर्टलवर नवीन योजनांची माहिती दिली जाते. त्याचबरोबर नोकरी अपडेट अशा इत्यादी प्रकारची माहिती या न्यूज पोर्टल वर दिली जाते. आज आपण या बातमीमध्ये शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. ती बातमी म्हणजे, नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची आता लवकरच दुसरी यादी प्रकाशित होणार आहे. दुसरी यादी कधी प्रकाशित होणार आहे. त्याचबरोबर या यादीत कोणत्या शेतकऱ्यांची नावे असतील अशी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
शेतकरी मित्रांनो, 50 हजार रुपये अनुदानाची पहिली यादी प्रसिद्ध करून लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात 50 हजार रुपये देखील ट्रान्सफर करण्यात आले आहेत. आता शेतकरी दुसऱ्या यादीच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु ही प्रतीक्षा देखील लवकरच संपुष्टात येऊन शेतकऱ्यांच्या खात्यात 50 हजार रुपये ट्रान्सफर केले जाणार आहेत.
ज्या शेतकऱ्यांनी नियमितपणे आपल्या पीक कर्जाची परतफेड केली होती. अशा शेतकऱ्यांसाठी उद्धव ठाकरे सत्तेत असताना त्यांनी 50 हजार रुपये अनुदानस्वरूपी देऊ ही घोषणा केली होती. आता सरकार बदलल्यानंतर शिंदे सरकारने ही योजना पुढे राबवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून पहिली यादी प्रकाशित करून लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात 50 हजार रुपये ट्रांजेक्शन देखील केले.50 Hajar Anudan
शेतकरी मित्रांनो याचबरोबर 2021 सालि आपल्या राज्यामध्ये सरकारने पंजाबराव देशमुख कृषी व्याज सवलत या योजनेअंतर्गत देखील मोठी घोषणा करण्यात आली आहे. ती घोषणा म्हणजेच ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्जाची नियमित पणे परतफेड केली आहे. अशा शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत तब्बल 3 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज दिले जाणार आहे.
ज्या शेतकऱ्यांनी पिक कर्ज घेतले होते. आणि त्यांना दिलेल्या वेळेवर पीक कर्जाची परतफेड केली होती. अशा शेतकऱ्यांसाठी आणखी नियम महत्वाची माहिती समोर आली आहे. ती म्हणजे अशा शेतकऱ्यांचा व्याज त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. मात्र काही शेतकऱ्यांच्या कर्जावर बँकांकडून व्याज आकारले जात नाही. परंतु ज्या शेतकऱ्यांच्या कर्जावर व्याज घेतले आहे. अशा शेतकऱ्यांची व्याजाची रक्कम यांनी तिच्या माध्यमातून त्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे.
नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची पहिली यादी प्रकाशित करण्यात आली होती. त्या यादीमध्ये राज्यातील जवळपास 7.5 लाखापेक्षा जास्त शेतकरी पात्र ठरवण्यात आले होते. आता राहिलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लवकरच अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे.
50000 प्रोत्साहन अनुदानाची दुसरी यादी ही 15 डिसेंबर च्या अगोदर प्रकाशित करण्यात येणार आहे. अशी माहिती प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आले आहे. परंतु माहितीनुसार दुसरी यादी ही उद्याच प्रकाशित केली जाऊ शकते.50 Hajar Anudan