Business Idea: आपण पाहतो बऱ्याचशा व्यक्तींना असे वाटते की आपल्या स्वतःचा व्यवसाय असावा. कारण मागील कोरोनाच्या संकटाच्या वेळी ज्या व्यक्तींना सरकारी नोकरी होती ती देखील किती दिवस टिकून राहील हे आपल्याला सांगता येत नाही. आपण पाहतो की त्या काळामध्ये बऱ्याचशा व्यक्तींना आपल्या स्वतःच्या नोकऱ्या ह्या गमवाव्या लागल्या. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती ही असा विचार करत आहे की छोटा का होईना परंतु स्वतःचा व्यवसाय असणे महत्त्वाचे आहे. परंतु स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा म्हणलं की प्रश्न येतो पैशाचा . व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला किती पैशाची गुंतवणूक करावी लागेल. व एखादा व्यवसाय सुरू केल्यानंतर त्यामधून आपल्याला नफा मिळेल का असे अनेक प्रश्न त्या व्यक्तीच्या मनामध्ये निर्माण होत असतात. तर आपण आज या लेखात अशा एका व्यवसायाबद्दल माहिती पाहणार आहोत कमी खर्चात व घरबसल्या आपल्याला भरपूर नफा मिळू शकतो. या व्यवसायाबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर हा लेख शेवटपर्यंत वाचा.
जर तुम्ही एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी इच्छुक असाल तर कमी पैशाची गुंतवणूक करून सुरू करता येऊ शकतो अश्या व्यवसाय बद्दल आपण आज माहिती पाहणार आहोत. या व्यवसायाची संधी ही अनेक खाजगी बँक आणि एसबीआय (SBI) तुम्हाला देऊ शकते. जर तुमच्याकडे तुमच्या स्वतःची काही जमीन असेल तर तुम्ही त्या जागेवरती एटीएम मशीन बसवून महिन्याला मोठी कमाई करू शकतात.परंतु त्यासाठी काही नियम व अटी आहेत त्या तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील.
भारतात एटीएम सुरू करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया ने टाटा इंडिकॅश , इंडिया वन एटीएम आणि मुथूट एटीएम सोबत करण्यासाठी करार केला आहे. जर तुम्हालाही एसबीआय एटीएम फ्रॅंचायझीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला फक्त कंपन्यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन करावे लागेल. तुम्ही दुसऱ्या कोणत्याही ठिकाणावरून अर्ज करू शकत नाही आणि दुसऱ्या ठिकाणावरून अर्ज केल्यास तुम्ही फसवणुकीला बळी पडू शकता कारण फसवणूक करणारे एटीएम फ्रेंचायझीच्या नावाखाली तुमची दिशाभूल करू शकतात.Business Idea
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला कशाप्रकारे प्रक्रिया करावी लागेल ते आपण इथे पाहणार आहोत जर तुम्हाला हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर प्रथमता एटीएम बसवण्यासाठी तुम्हाला बँकेच्या शाखेत जावे लागेल आणि तिथे जाऊन या व्यवसायाबद्दल संपूर्ण माहिती घ्यावी लागेल. हा व्यवसाय सुरु करण्यासाठी काही अटी आहेत. जर तुम्ही त्या अटी मान्य करत नसाल किंवा त्या अटी मान्य करू शकत नसाल तर तुम्हाला एटीएम बसवता येणार नाही. जर तुम्ही त्या अटी पूर्ण करत असाल तर त्या अटी पूर्ण केल्यानंतर तुम्ही अर्ज करू शकता आणि तुमच्या अर्जा नंतर बँक पडताळणी करते. ही प्रक्रिया पूर्ण झाली की लगेच तुमच्या जागेवर एटीएम स्थापित केले जाईल.
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याकडे काय असणे गरजेचे आहे ते आपण इथे पाहू जर तुम्हाला हा व्यवसाय करायचा असेल तर तुमच्याकडे 50 ते 80 स्क्वेअर फुट क्षेत्रफळ असावे. जागाही निवासी नसून व्यवसायिक असणे महत्त्वाचे आहे. आपण पाहतो की जर आपल्याला एटीएम चा व्यवसाय सुरू करायचा असेल तर लोकांना सहज उपलब्ध होईल असे ठिकाण पहिजे. व त्या ठिकाणी सतत वीज उपलब्ध असावी वीज जोडणीसाठी किमान 1kW वीज जोडणी असणे आवश्यक आहे. विटांनी आणि काँक्रीटनी बनलेली एक खोली देखील कायमस्वरूपी असावी.
हे एटीएम आपल्याला कोणत्याही सोसायटीमध्ये बसवायचे असेल तर व्ही- सॅट सुरू करण्यासाठी अधिकाऱ्यांकडून किंवा सोसायटीकडून न हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागेल.Business Idea