Cotton Manure Management: नमस्कार शेतकरी मित्रांनो, अनेक शेतकऱ्यांना कापूस पिकाला पहिला डोस कोणत्या खताचा द्यायचा याबद्दल संपूर्ण माहिती असते. परंतु अनेक शेतकरी पहिला खताचा डोस कोणता द्यावा याबाबत विचार करत असतात. त्याचबरोबर काहीतरी बदलून बघितल्यावर आपले पीक जास्त प्रमाणात उमलेल का? याचा देखील विचार शेतकऱ्यांच्या मनात येतो. यामुळे शेतकरी अनेक जणांना याबद्दल विचारतात. चला तर मग आपण या बातमीतील पाहूया की कापूस पिकाला पहिला डोस कोणत्या खताचा द्यावा?
मित्रांनो अनेक शेतकरी कापूस पिकाची लागवड करण्याअगोदर खत पेरतात आणि काही शेतकरी कापूस लागवड केल्यानंतर लगेचच म्हणजेच कापूस लागवड आणि खत दोन्ही एकत्र देतात. तर काही शेतकरी कापूस लागवड झाल्यानंतर काही दिवसांनी कापसाला खताचा पहिला डोस देतात.
त्याचबरोबर तुम्ही जर कापूस लागवड केल्यानंतर उशिरा खताचा पहिला डोस दिला तर ते खत पिकाला लागू होत नाही. आणि यामुळे आपल्याला कापूस उत्पन्नात घट दिसून येतो..
1) 10_26-26 एक एकर साठी 1-दीड बॅग
2 ) 20-20-00-13 एकरी दीड ते दोन बॅग
3) 10-46-001 एकरी 1-दीड बॅग+25
4) सिंगल सुपर फॉस्फेट 2 आणि 25 किलो पोटॅश
वरील खतांच्या बॅगीपैकी तुम्ही पहिल्या डोसा साठी कुठलीही बॅग निवडू शकता. आणि जर तुम्हाला खत पेरण्यासाठी पेडणीनंतर उशीर झाला तर तुम्ही या खतामध्ये 20 किलो युरिया मिक्स करून खत पेरणी करू शकता. अशाप्रकारे तुम्ही खत पेरणीची उपाययोजना केली तर तुमची कापूस येण्याची व्यवस्था खूपच छान होईल कापसाचे उत्पादन भरभराटीने येण्यास सुरुवात होईल. Cotton Manure Management