Breaking news: नमस्कार मित्रांनो,आज आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत की, राज्यातील कोणत्या मुलींना मिळणार मोफत शिक्षण मोफत शिक्षण घेण्यासाठी कोणकोणत्या मुली पात्र ठरतील हे आपण या बातमीमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग पाहूया.
ज्या मुली व्यवसाय शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेणार आहेत आणि ज्या मुली आर्थिक दृष्ट्या दुर्बळ आहेत,(EWS), सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग (SEBC) तसेच इतर मागासवर्ग (OBC) या सर्व प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क परीक्षा शुल्काच्या 50% एवजी 100% लाभ मंजूर करण्यात आला आहे.
व्यवसायिक शिक्षणामध्ये मुलींचे प्रमाण 36% आहे. म्हणून शासनाने नवीन शैक्षणिक धोरणानुसार व्यवसायिक शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढवण्यासाठी मुलींना सारख्या प्रमाणात शिक्षणाच्या संध्या उपलब्ध व्हाव्यात, आणि त्याचबरोबर व्यवसायिक शिक्षणामध्ये मुली वंचित राहू नये यासाठी शासनाने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विचार विनिमय करून निर्णय घेण्यात आले आहेत.
EWS आरक्षणातून शैक्षणिक प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेचा लाभ प्रथम वर्षाकरिता मिळाल्यानंतर ही सवलत त्यांच्या अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत राहील. आणि दुसऱ्या वर्षापासून दरवर्षी विद्यार्थ्यांना उत्पन्नाचे प्रमाणपत्र द्यावे लागेल.