Cotton crop fertilizer spraying: कापूस पिकाला द्या वेळेवर खत आणि फवारणी, नाहीतर होईल पिकाची नासाडी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cotton crop fertilizer spraying: नमस्कार मित्रांनो, आज आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत की कापसावर कधी आणि तशी फवारणी करायची, फवारणी करत असताना आपण विचारात पडतो कोणत्या औषधाची फवारणी करावी आणि त्याचे प्रमाण किती घ्यावे तुम्ही जास्त झाल्यास पिकांवर काही दुष्परिणाम होणार तर नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला याबद्दल खूप महत्त्वपूर्ण माहिती सांगणार आहोत.

महाराष्ट्र मध्ये कापूस लागवड भरपूर प्रमाणात केली जाते. यंदा पाऊस हा उशिरा आला त्यामुळे कापूस लागवडीतही उशीर झाला तरीही यावर्षी 40 लाख हेक्टर पेक्षाही जास्त कापसाची लागवड केली आहे. ही कापूस लागवड क्षेत्रातील वाढ समाधानकारक आहे. कापूस लागवड झाल्यापासून आतापर्यंत कापसाचे पीक 50 ते 60 दिवसाचे झाले आहे. आता या पिकाला खत आणि फवारणीची गरज आहे.

काही शेतकरी पिकाला पूर्व हंगामी आणि हंगामी कापसाला युरियाचा अतिरेक वापर करतात, संतुलित म्हणजेच नैसर्गिक खत वापरावे आणि हे खते फेकण्यापेक्षा कापसाच्या झाडाभोवती गोल करून टाकावे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सध्या पिकावर तुडतुडे, मोवा आणि फुलकिड्याचा प्रादुर्भाव झाला आहे काही ठिकाणी पांढरी माशी किंवा पिठ्या ढेकण्याचा प्रादुर्भाव झाला आहे. हे कीटक पिकाची नासाडी करतात, म्हणूनच यावर फवारणीची अत्यंत गरज आहे. पाऊस हा चालू आहे कधी येईल सांगता येत नाही म्हणून फवारणी करता वेळेस प्रतिपंप 10 मिली स्टिकर वापरावे, आणि एका वेळी एकाच कीटकनाशकाची फवारणी करावी. फवारणी करता वेळेस पाणी हे स्वच्छ असायला हवे. नियंत्रणासाठी मेटासी स्टॉक 15 मिली प्रति 15 लिटर पाण्यातून फवारा.

कापसाच्या पानावर जर ठिपके किंवा बुरशीचा प्रादुर्भाव झाला तर त्यावर बावीस्टीन 15 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यातून फवारा, जर फुल किड्यांचा प्रादुर्भाव झाला तर सुरुवातीला सौम्य कीटकनाशक फवारा, त्यावर नियंत्रण न झाल्यास तीव्र कीटकनाशके वापरावे दोन फवारण्यांमध्ये 8 ते 10 दिवसाचे अंतर ठेवावे, बोंडाची चांगली वाढ होण्यासाठी कापसाचे पाने हिरवेगार राहणे खूपच गरजेचे असते.

Leave a Comment