Thu. Nov 21st, 2024
Nukasan Bharpai
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Nukasan Bharpai: नोव्हेंबर महिन्यामध्ये झालेल्या आपले पावसामुळे लाखो हेक्टर वरील शेती पिकाचे नुकसान झाले होते. आणि या नुकसान भरपाई साठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात अर्ज देखील केलेले होते. त्याचबरोबर सरकारकडून शहर मंजूर करण्यात आले आहेत. आणि त्यासाठी आता सरकारकडून 2 लाख 56 हजार 625 शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी सुरुवात झाली आहे.

त्याचबरोबर 13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी 22 हजार रुपये जमा करण्याचा शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक खूपच आनंदाची बातमी आहे.

कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई…

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1) नाशिक या जिल्ह्यातील तीन लाख 50 हजार शेतकऱ्यांची नुकसान झाले होते. आणि या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी 155 कोटी रुपये निधी मंजूर झालेला आहे. त्याचबरोबर हा निधी उद्यापासून या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे.Nukasan Bharpai

2) जळगाव या जिल्ह्यात देखील जवळपास 50 हजार  शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. आणि या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील 4 कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. आणि उद्यापासून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात देखील हे पैसे जमा होणार आहेत.

3) नगर या जिल्ह्यातील तब्बल दोन लाख शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान झाले होते. आणि या शेतकऱ्यांसाठी सरकारकडून 160 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. 4) सोलापूर या जिल्ह्यात 82 हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. ठाणे या नुकसानाची भरपाई देण्यासाठी सरकारकडून 111 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

5) सातारा या जिल्ह्यातील चाळीस हजार चारशे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान झाले होते. आणि या शेतकऱ्यांना 80 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. 6) सांगली या जिल्ह्यातील 30 हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. आणि या नुकसानीची भरपाई देण्यासाठी या जिल्ह्याकरिता 22 कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे.

7) बीड जिल्ह्यातील 7 लाख 70 हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. आणि या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देण्यासाठी सरकारकडून 401 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे बीड जिल्ह्यात देखील उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा केले जाणार आहे. तसेच इतर सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील सरकारकडून नुकसान भरपाई दिली जाणार आहे…Nukasan Bharpai

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *