Buisness Idea: नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वात अगोदर तुमचे या `नवीन योजना पोर्टल’ वर मनापासून स्वागत आहे. आपण या पोर्टल वर दररोज नवनवीन योजना त्याचबरोबर शेती संबंधित उद्योग किंवा कोणताही वेगळा उद्योग अशा इत्यादी बद्दल माहिती जाणून घेत असतो. आज आपण अशाच एका जास्त नफा देणाऱ्या व्यवसाय बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
अमुलची फ्रॅंचायजी घेऊन तुम्ही महिन्याला तब्बल 5 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंत नफा मिळू शकतात. डेअरी प्रोडक्ट बनवणारी कंपनी अमुल सोबत व्यवसाय करण्याची सर्वसामान्य नागरिकांना ही एक उत्तम संधी आहे.अमुलची ही कंपनी आता फ्रॅंचायजी सर्वसामान्य नागरिकांना देखील देत आहे. यामुळे तुम्ही देखील तुमचा व्यवसाय मोठ्या झपाट्याने वाढवू शकता.
अमुलची फ्रॅंचायजी घेऊन तुम्ही जर व्यवसाय केला तर तुम्हाला खात्रीशीरपणे कधीच तोटा होऊ शकत नाही. कारण हजारो लोकांचे मत आहे की अमुलची फ्रॅंचायजी ही एक परवडणारी गोष्ट आहे. यामुळे तुमच्यासाठी ही एक सुवर्णसंधीच म्हणावी. त्याचबरोबर अमुल कंपनी कोणतीही रॉयल्टी किंवा नका शिवाय आतापर्यंतच्या फ्रॅंचायजी देत आहे.Buisness Idea
नागरिकांना ही फ्रँचायजी घेण्यासाठी आता जास्त खर्च करण्याचा देखील आवश्यकता नाही. तुम्ही फक्त 2 लाख रुपये गुंतवून ही फ्रॅंचायजी घेऊ शकता. त्याच बरोबर तुम्ही जर अमुलची फ्रॅंचायजी घेऊन व्यवसाय सुरू केला तर तुम्ही प्रत्येक महिन्याला तबला 5 लाख ते 10 लाख रुपये निव्वळ नफा कमवू शकता.
व्यवसाय करण्यासाठी जागा निवडणे महत्वाचे!
अमुलची सोबत व्यवसाय करताना तुम्हाला फक्त जागा चांगली निवडावी लागेल. ज्यावेळेस तुमच्या जागे पाशी जास्त लोक ये जा करत असतील त्या वेळेसच तुम्हाला जास्त ग्राहक असेल यामुळे तुम्ही अधिकाधिक नफा कमवू शकता. त्यामुळे तुमची निवडलेली जागा ही अशा ठिकाणी असायला पाहिजे की त्या ठिकाणी जास्त गर्दी असावी.
तुम्हाला जर हा व्यवसाय करण्याची इच्छा असेल तर तुम्ही फ्रॅंचायजी कशी घ्यायची याची माहिती आपण खालील प्रमाणे पाहुयात.
अमुलची फ्रॅंचायजी कोणत्या पद्धतीची फ्रँचायजी किती रुपयाला मिळते हे आपण पुढील प्रमाणे पाहूयात- अमोल आउटलेट ही फ्रॅंचायजी घेण्यासाठी आपल्याला दोन लाख रुपये गुंतवणूक करावी लागेल, अमोल रेलवे पार्लर या फ्रॅंचायजी साठी देखील आपल्याला दोन लाख रुपये गुंतवावे लागतील. त्याचबरोबर तुम्हाला जर अमुलची आईस्क्रीम स्कूपिंग पार्लर ही फ्रॅंचायजी घ्यायचे असेल तर तुम्हाला पाच लाखांची गुंतवणूक करावी लागेल. यामधील 25 ते 50 हजार रुपये रिफंडेबल ब्रँड सिक्युरिटी म्हणून अमुलची द्यावे लागतील.
अमुलची फ्रॅंचायजी घेण्यासाठी तुम्हाला अमुलची अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा लागेल. किंवा तुम्ही त्यांच्या ईमेल आयडी वर देखील ई-मेल करू शकता. ईमेल करण्यासाठी पुढील प्रमाणे ई-मेल आयडी retail@amul.coop ही अमुलची ईमेल आयडी आहे. यावर ई-मेलवरून तुम्ही अमुलची फ्रॅंचायजी घेऊ शकता. किंवा तुम्ही खाली दिलेल्या वेबसाईटला भेट देऊन देखील फ्रॅंचाईजी घेऊ शकता.Buisness Idea
वेबसाईट-https://amul.com