Thu. Nov 21st, 2024
Agriculture news
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Agriculture news: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण केळीचे यावर्षीचे नवीन दर काय आहेत हे या लेखांमध्ये पाहणार आहोत आजच्या केळीच्या बाजारभावामध्ये झपाट्याने वाढ होऊ लागली केळीचे तर हे सोन्याच्या दराला मागे टाकत आहेत.केळीच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आपण पाहूया की कोणत्या जिल्ह्यामध्ये केळीला सोन्याचे दर मिळत आहेत.

सोन्यासारखे दर हे जळगाव जिल्ह्यात पाहायला मिळत आहेत. यावर्षी केळीला मोठ्या प्रमाणात जळगाव जिल्ह्यामध्ये इतर जिल्ह्यांपेक्षा जास्त दर मिळत आहे. जळगाव जिल्ह्यातील केळीला सर्वत्र मागणी आली आहे. दरवर्षी जळगाव जिल्ह्यातील हिवाळ्यातील केळीच्या दरामध्ये मोठी घसरण होते त्यांना योग्य प्रमाणात दर मिळत नसतो त्यांचा उत्पन्नाचा खर्च सुद्धा निघत नाही पण यावर्षी हिवाळ्यातील केळीच्या दराला मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

शेतकऱ्यांचा उत्पन्नाचा खर्च निघून त्यांना 25 हजार रुपये उत्पन्न शेतकऱ्याला मिळत आहे. 25 हजार रुपये उत्पन्न दरवर्षी राहायला हवे कारण केळीची शेती करायची म्हटलं तर त्यासाठी उत्पादनाचा खर्च मोठ्या प्रमाणात येतो तो भरून काढण्यासाठी केळीच्या दराला योग्य भाव मिळावा त्यामुळे शेतकरी कोणत्याही संकटात पडणार नाहीत.Agriculture news

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

केळीचे उत्पादन हे महाराष्ट्रातील जळगाव जिल्हा त्यासाठी प्रसिद्ध मानला जातो. उत्पादन हे जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्याचबरोबर हे उत्पादन तमिळनाडू आणि गुजरात मध्ये ही घेण्यात येते. केळीचे उत्पादन घेण्यासाठी योग्य त्या तापमानाची गरज असते.

केळीच्या शेतीसाठी जळगाव योग्य ठिकाण आहे. जळगाव मध्येमध्ये तापी नदीच्या काठी येणारी जमीन ही कोरड्या तापमानाची आहे तिथे केळीचे उत्पादन घेतल्यास तर ते चांगले येते कारण तेथील तापमान 40° पेक्षा जास्त असते. तिथे काळी माती आणि शेणखताचा वापर केला जातो. त्यामुळे तेथील केळी गोड लागते.आणि दिसायलाही आकर्षित वाटते.

महाराष्ट्रात केळीच्या शेती मुळे शेतकऱ्यांना मोठा मान मिळाला आहे. महाराष्ट्र मध्ये जळगाव केळीच्या व्यापारामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. जळगाव हे केळीच्या शेतीसाठी प्रसिद्ध झाले आहे. जळगावल आता सोन्याचे शहर म्हणून ओळखले जात आहे. कारण जळगाव मध्ये केळीच्या शेतीने सोन्याच्या दराला मात दिली आहे. महाराष्ट्रामध्ये 100% पैकी 67% केळीची शेती जळगाव मध्ये केली जाते. आणि या शेतीतून 25000 कोटी रुपयांचे उत्पन्न जळगावातील शेतकऱ्यांना होते.Agriculture news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *