Farming idea शेतकरी मित्रांनो तुम्ही पशुपालन हा व्यवसाय करत असाल तर पशुचे व्यवस्थापन करणे फार गरजेचे असते. शेतकरी शेताला जोडधंदा म्हणून पशुपालन हा व्यवसाय करतात.
या व्यवसायात दुधाचे सर्व प्रथम स्थान आहे. दुग्ध उत्पादन करायचे म्हटले तर सर्वात मोठा हेतू म्हणजे पशूच्या आहारावर लक्ष ठेवणे त्यांना वेळच्यावेळी पूरक असा आहार देणे. आहारामध्ये वेगवेगळ्या बदल करणे.
म्हशीच्या दुधामध्ये वाढ करण्यासाठी त्यांच्या आहारचे व्यवस्थापन खालील प्रमाणे करा.
1) गाय असो की म्हैस प्रश्न त्यांच्या आहाराचा असला तर त्यांना हिरवा चारा आणि कोरडा चारा त्याचबरोबर सुग्रास पेंड हे त्यांच्या शरीरासाठी खूप महत्वसंपूर्ण आहे. गाय असो की म्हैस त्यांचे साधारण 400 किलो वजन असेल तर 25 किलो हिरवा चारा लागतो.
2) ऊस, कडबा ,वाडे, हिरवा चारा , इत्यादींची जर आपण कुट्टी केली आणि ती म्हैसला दिली तर त्यांना व्यवस्थित पचन होते व त्यातील पोषक पदार्थ शोषण दुधात रूपांतर होते व दूध वाढीसाठी उपयुक्त होते. त्यांनाही कुठे नियमित दिली तर म्हैस भरपूर पाणी पिते आरोग्यदायी व तंदुरुस्त राहते.
3) चाऱ्यासोबतच सकाळी आणि संध्याकाळी किंवा शेंगदाण्याची पेंड, आपण यात सुग्रास चा सुद्धा वापर करू शकतो.Farming idea
4) म्हशीची जर पचन क्षमता वाढवायची असेल तर प्रथिने व खजिने यामध्ये पचन करण्याची क्षमता असते आपण जर त्यांना गवांडे सोबत जर तुम्ही खाऊ घातले तर त्यांना पचन करण्यासाठी उत्तम ठरेल.
5) कडबा कुट्टी सरकी पेंड अर्धा किलो ज्वारीचा भरडा व 30 ग्रॅम खनिज मिश्रण दिले तर अन्नद्रव्याचे पातळी पूर्ण होऊन म्हशी दूध देण्यात सातत्य ठेवतात. म्हशीचे वजन 400 ते 450 एक किलो हे साधारणपणे असतेच अशा म्हैसनी आठ लिटर दुधाला सात ते आठ टक्के फॅट लागणे. महत्वाचे असते. आपण त्यांच्या आहारामध्ये गरम आपल्या घरामध्ये खाद्य व धान्याचा वापर सुद्धा करू शकतो. यामुळे म्हशीच्या उत्पादनात वाढ होते.
6) दुष्काळी परिस्थितीमध्ये हिरव्या चाऱ्याची कमतरता भासू नये त्यामुळे त्यांच्या पूरक खाद्य मिश्रण तयार करणे जेणेकरून आरोग्य व्यवस्थापन हे सुरळीतपणे राहील. म्हशीच्या आहाराचे व्यवस्थापन करण्यासाठी आपण घरी त्यांच्यासाठी खूराक तयार करू शकतो खुराक तयार करण्यासाठी ज्वारी मखा पेंड डाळीची जुनी तीस ते पस्तीस टक्के आपण घेऊ शकतो दोन टक्के खनिज मिश्रण व एक टक्के मीठ मिसळावे हा खराक आपण . म्हशीना 2 वेळा देऊ शकतो. म्हशीचे दूध उत्पादनात वाढ करायचे असेल तर त्यांना बरसिम गवत, हिरवे लूसर्ण घातल्यास त्यांना पोषक तत्वे याची गरज भासत नाही म्हशींच्या आहारात अन्नद्रव्याचा पुरवठा झाल्यास माजावर वेळेत येतात. व त्यांना प्रजनन संबंधासाठी कोणत्याही समस्या निर्माण होत नाही.Farming idea