Government scheme: आपण पाहतो की बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मुलांचे म्हणणे हे खूप शिकण्याची असते. परंतु शिक्षण घेत असताना त्यांना पैशाची अडचण येत असते. तर ती अडचण भासू नये म्हणून आपल्याला आता शिक्षणासाठी कर्जही मिळणार आहे. शैक्षणिक कर्ज म्हणजे नेमके काय? त्याचबरोबर शैक्षणिक कर्ज घेतल्याचे फायदे कोणकोणते होतात? याबद्दल माहिती आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत.
विद्यार्थी बारावी पास होतो आणि नंतर त्याला पदवी किंवा दुसऱ्या कोणत्याही क्षेत्रात शिक्षण घेण्यासाठी बँकांकडून जी रक्कम व्याजाने म्हणून घेतली जाते त्यालाच शैक्षणिक कर्ज असे म्हणतात. आपल्याला जर उच्च शिक्षण घ्यायचे म्हणले तर आपल्याला शैक्षणिक कर्ज मिळू शकते. खाजगी तसेच सरकारी बँका ही आपल्याला शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देत असतात.Government scheme
शैक्षणिक कर्जाचा मासिक परतफेड हप्ता म्हणजे काय? आपण जे शिक्षणासाठी कर्ज म्हणून घेतलेली रक्कम असते त्या रकमेची व्याजासह पूर्ण परतफेड होईपर्यंत दर महिन्याला समान हफ्त्यामध्ये परत केली जाणारी रक्कम म्हणजेच मासिक परतफेड हप्ता. मासिक परतफेड हप्ता म्हणजेच ईएमआय होय. आपण जर मासिक परतफेडचा विचार केला तर त्यामध्ये दर महिन्याला व्याज आणि मुद्दल रक्कम यांचा समावेश असतो. शैक्षणिक कर्ज घेण्यासाठी प्रत्येक बँकेची वेगवेगळी शैक्षणिक कर्जाची मर्यादा असू शकते. विद्यार्थी ज्या क्षेत्रात शिक्षण घेत आहे त्या क्षेत्रासाठी शैक्षणिक कर्ज घेतले असल्यास ते शैक्षणिक कर्ज परतफेड तो विद्यार्थी त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यावर किंवा त्या विद्यार्थ्याला नोकरी लागल्यावर करु शकतो. कर्ज परतफेड करण्यासाठी सुद्धा प्रत्येक बँकेचे नियम वेगवेगळे असतात.
शैक्षणिक कर्ज घेतले तर त्याचे अनेक फायदे आहेत
– ते आपण येथे पाहणार आहोत. आपण जेवढे शिक्षण घेतो त्या एकूण शैक्षणिक खर्चाच्या 90% पर्यंत बँका कर्ज देत असतात.
– कर्जाची परतफेड ही आपल्याला लगेच करावी लागत नाही आपण ती परतफेड अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर करू शकतो.
– शैक्षणिक कर्जामुळे संबंधित अभ्यासक्रमाचा शैक्षणिक रक्कम, वह्या पुस्तकांचा खर्च आणि हॉस्टेलचा खर्च भागवला जातो.
– शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर त्याचबरोबर नोकरी लागेपर्यंत काही बँका ह्या वेळ देत असतात त्यामुळे आपल्याला ते कर्ज परतफेड साठीच योग्य नियोजन करता येते आणि कर्ज परतफेड करण्यासाठी आपल्याला पुरेसा वेळ मिळतो.
– दिलेल्या व्याजावर प्राप्ती करत वजावट मिळू शकते.
वेळेवर कर्ज परतफेड करणे तुमच्या कर्जाची पत वाढवण्यासाठी महत्त्वाची असते त्यामुळे भविष्यातील दुसरे कर्ज घेण्यासाठी तुमची पत सुधारली जाते.Government scheme