Agriculture land: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज या बातमी पाहणार आहोत की कोणत्या नागरिकांना जमीन खरेदी करण्यासाठी 30 लाख रुपये मिळणार आहेत. त्याचबरोबर 30 लाख रुपये मिळवण्यासाठी त्या नागरिकाला अर्ज कोठे करावा लागणार आहे?? अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे अशी संपूर्ण माहिती आज आपण या बातमीत पाहणार आहोत. यामुळे तुम्ही ही बातमी संपूर्ण नक्की वाचा.
सुरुवातीला आपण 30 लाख रुपये नागरिकांना कोणत्या योजनेमार्फत मिळणार आहेत त्याची माहिती पाहुयात. मित्रांनो दादासाहेब गायकवाड सबलीकरण या योजनेअंतर्गत नागरिकांना जमीन खरेदी करण्यासाठी 30 लाख रुपये दिले जाणार आहेत. ही योजना महाराष्ट्राच्या सामाजिक व विशेष विभागामार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेमार्फत ज्या नागरिकांकडे शेत जमीन नाही. जे नागरिक मजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवत आहेत. त्यांचे उत्पन्न खूपच कमी आहे अशा सर्व नागरिकांना या योजनेमार्फत सरकारकडून अनुदान दिले जाणार आहे.
दादासाहेब गायकवाड सबलीकरण ही योजना जेव्हा सुरू करण्यात आली होती. त्यावेळेस या योजनेमार्फत नागरिकांना फक्त 50 टक्के अनुदान दिले जात होते. परंतु आता या योजनेत बदल करून नागरिकांना शेत जमीन खरेदीसाठी 100% अनुदान दिले जाणार आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दोन एकर बागायती जमीन आणि चार एकर कोरडवाहू जमीन खरेदी करण्यासाठी तब्बल 30 लाख रुपये अनुदान सरकारकडून दिले जाणार आहे.Agriculture land
या योजनेची पात्रता काय आहे??
दादासाहेब गायकवाड या योजनेअंतर्गत नागरिकांना 30 लाख रुपये जमीन खरेदी करण्यासाठी मिळवण्यासाठी लाभार्थीचे वय कमीत कमी 18 वर्ष असावे आणि जास्तीत जास्त वय हे 60 वर्षे असावे. त्याचबरोबर लाभार्थी नागरिक हा दर्द रेषेखालील भूमिहीन शेतमजूर असणे आवश्यक आहे. परित्यक्त विधवा महिलांना या योजनेचा लाभासाठी प्राधान्य दिले जाते.
दादासाहेब गायकवाड साबळीकरण या योजनेच्या अटी काय आहेत खालील प्रमाणे पाहुयात…
या योजनेचा लाभ अशा नागरिकांना दिला जात नाही की, ज्या नागरिकांनी महसूलवन विभागाने गायरान व सिलिंग जमीन दिले आहे. त्याचबरोबर ज्या कुटुंबाला आधीच अश्या सरकारच्या योजनेमार्फत लाभ दिला गेला आहे. अशा व्यक्तींना देखील या योजनेतून लाभ दिला जात नाही. त्याचबरोबर लाभार्थी नागरिकांना अनुदानावर मिळालेली जमीन कोणत्याही व्यक्तीच्या नावावर हस्तांतरित करता येत नाही. किंवा त्याला कोणालाही विकता येत नाही. त्या लाभार्थी नागरिकाला स्वतः जमिनी संपादित करावी लागणार आहे.
या योजनेचा अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे
- अर्जदार हा अनुसूचित जातीतील असण्याचा पुरावा
- रहिवासी पुरावा
- आधार कार्ड
- निवडणूक ओळखपत्र
- अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो
- रेशन कार्ड झेरॉक्स
- भूमिहीन शेतमजूर असल्याचे तहसीलदारांनी दिलेले प्रमाणपत्र
- मागील वर्षाच्या वार्षिक उत्पन्नाच्या तहसीलदाराचा दाखला
- वय प्रमाणपत्र (18 पेक्षा जास्त असावे आणि 60 वर्षापेक्षा कमी असावे)
- शेतजमीन पसंती बाबत लाभार्थ्याचे 100 रुपये वरील स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र.
दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेचा अर्ज कोठे करावा?
वरी दिलेले सर्व कागदपत्रे अर्ज विहित नमुन्यात संबंधित सहाय्यक आयुक्त किंवा समाज कल्याण कार्यालयाकडे जमा करावीत.Agriculture land