Buisness Idea: या फळाची शेती करून एका वर्षात कमवा 20 लाख रुपये; सरकारकडून देखील मिळणार लागवडीसाठी अनुदान

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Buisness Idea: नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचे `नवीन योजना’ या पोर्टलवर सर्वात अगोदर स्वागत आहे. आम्ही या नवीन योजना पोर्टलवर नेहमीच नवीन योजना, बाजार भाव, शेतीशी संबंधित व्यवसाय, जोडधंदा अशा इत्यादी विषयांवर माहिती सांगत असतो. त्याचबरोबर आज आपण एका फळाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. जेणेकरून या फळाची लागवड करून शेतकरी चांगला नफा घेऊ शकतात. त्याचबरोबर या फळावर शासन अनुदान देत आहे. असे संपूर्ण माहिती आपण या बातमीमध्ये आहोत.

अलीकडच्या काळामध्ये सर्व शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. त्याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी चांगल्या प्रकारे उत्पन्न घेत आहेत. मित्रांनो तुम्हाला देखील कमी जागेमध्ये शेती करून जास्त नफा घ्यायचा असेल तर ही बातमी संपूर्ण नक्की वाचा.

आज आपण या बातमीत ड्रॅगन फ्रुट या फळाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. म्हणजेच या फळाची शेती कशी करायची हे शेती करण्यासाठी सरकार अनुदान कसे देते अशी माहिती आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत. ड्रॅगन फ्रुटचे बाजारामध्ये मागणी खूपच वाढलेली आहे. मात्र, देशांतर्गत ड्रॅगन या फळाची लागवड खूपच कमी प्रमाणात केली जाते. या फळाची शेती करून शेतकरी चांगला नफा घेऊ शकतात. या हेतूने आता हरियाणातील सरकार शेतकऱ्यांना या फळाची शेती करण्यासाठी अनुदान देखील देत आहे.Buisness Idea

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

हरियाणातील राज्य सरकार ड्रॅगन या फळासाठी अनुदान देत आहे. या अनुदानाचा लाभ घेऊन शेतकरी देखील आता ड्रॅगन या फळाची शेती करू लागले आहेत. हरियाणातील राज्य सरकार शेतकऱ्यांना प्रति एकर 1 लाख 20 हजार रुपये अनुदान देत आहे. यामुळे आता हरियाणातील ड्रॅगन फळाखालील क्षेत्र हळूहळू वाढत आहे. सरकारच्या या योजनेच्या मार्फत शेतकरी दहा एकर ड्रॅगन फळाची शेती करण्यासाठी अनुदानाचा लाभ घेऊ शकतात.

शेतकरी मित्रांनो, हरियाणा हे पहिले राज्य ठरले आहे की, ड्रॅगन फ्रुट वर अनुदाने देत आहे. हरियाणा राज्य सरकारच्या फलोत्पादन या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. यामध्ये शेतकऱ्याला पहिल्या वर्षी तीस हजार रुपये, दुसऱ्या वर्षी दहा हजार रुपये आणि तिसऱ्या वर्षी दहा हजार रुपये अनुदान दिले जातील.

त्याचबरोबर शेतकऱ्याला जर 10 एकर ड्रॅगन फ्रुटची शेती करायचे असेल तर त्या शेतकऱ्याला हरियाणा सरकार तब्बल 12 लाख रुपये आर्थिक मदत म्हणून अनुदान देणार आहे. त्याचबरोबर हे अनुदान प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्याला हरियाणा सरकारच्या मेरी फसल मेरा ब्योरा या अधिकृत पोर्टल वर नाव नोंदणी करावी लागणार आहे.

विशेष म्हणजे या फळाची शेती करण्यासाठी शेतकऱ्याला जास्त पावसाची गरज नाही. त्याच बरोबर हे फळ कोणत्याही जमिनीत येऊ शकते. त्याच बरोबर या फळाची चांगली वाढ होऊ शकते. आणि या फळाला जास्त सूर्यप्रकाशाची गरज देखिल नाही. यामुळे कोणताही शेतकरी ड्रॅगन फ्रुट ची शेती सहज करू शकतो.

त्याचबरोबर शेतकरी ड्रॅगन फ्रुट या फळाची शेती करून चांगली कमाई देखील करू शकतात. अंदाजानुसार, एक एकर शेतीतून वर्षाला 8 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्याला उत्पन्न मिळू शकते. त्याचबरोबर तुम्ही जर दोन एकर मध्ये ही शेती केली तर तुम्हाला सहज वीस लाखापर्यंत उत्पन्न मिळू शकते. परंतु, या फळाची शेती करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला जवळपास 4 लाख ते 5 लाख रुपये गुंतवावे लागतील. म्हणजेच या फळाची लागवड करण्यासाठी तुम्हाला 4-5 लाख रुपये खर्च करावे लागतील.Buisness Idea

Leave a Comment