Farming Idea: भारत देशाला कृषिप्रधान देश म्हणून ओळखले जाते.आपल्या देशामध्ये शेती हा व्यवसाय प्रामुख्याने जास्त प्रमाणात केला जातो. आपण पाहतो की भारतातील शेतकरी हे एक पीक सारखे सारखे घेत असतात, परंतु आता गेल्या काही वर्षात शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण झाली आहे. आता शेतकऱ्याने एकच पीक सारखे घेणे किंवा पारंपारिक शेती करणे सोडून नवीन पिके घेण्यास सुरुवात केली आहे. ज्या वनस्पती मधून शेतकऱ्यांना फायदा होईल अशा वनस्पतीची लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला आहे. तर आज आपण या लेखांमध्ये निलगिरी या वनस्पतीची लागवड करून शेतकरी आरामात लाखोंचा नफा कमवताना पाहणार आहोत.
निलगिरी या वनस्पतीची शेती कशाप्रकारे करावी, त्याचबरोबर या निलगिरी वनस्पतीचा उपयोग कोणकोणत्या ठिकाणी करण्यात येतो. निलगिरीची शेती करायची म्हणलं तर त्यासाठी कोणते हवामान योग्य आहे, त्याचबरोबर शेती कशी असली पाहिजे आणि त्यातून उत्पन्न किती मिळेल याबद्दल सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.Farming Idea
निलगिरी ची शेती करायची म्हणलं तर सर्वप्रथम आपल्याला आपल्या शेतीचे नांगरणी करून घ्यावी लागते. शेताची नांगरणी झाल्यानंतर माती मोकळी होऊन ती समतोल होते. निलगिरी ची झाडी लावण्यासाठी आपल्याला शेतात 5 फूट अंतरावर 1 फूट रुंदीचे व खोलीचे खड्डे तयार करावेत. निलगिरीची झाडे लावताना आपण जी रांग तयार करणार आहोत त्यामध्ये 5 ते 6 फूट अंतर ठेवावे. निलगिरीच्या वनस्पतीमध्ये आपण दुसरे आंतरपीक सुद्धा घेऊ शकतो. या वनस्पतीमध्ये आपण आंतरपीक घेतल्यानंतर त्यातून आपल्याला खूप नफा मिळू शकतो.
निलगिरी चे झाड मोठे झाल्यानंतर त्या लाकडांचा उपयोग हा इंधन, कागदाचा लगदा आणि फर्निचर बनवण्यासाठी केला जातो. ही वनस्पतीची मोठी होण्यासाठी कमीत कमी 5 ते 8 वर्ष लागतात.
या वनस्पतीची लागवड करण्यासाठी ज्या भागात 30 ते 35 अंशाच्या आसपास तापमान असेल त्या भागात या वनस्पतीची लागवड करणे योग्य राहते. या वनस्पतीची वाढ होण्यासाठी चिकणमाती योग्य मानली जाते. ज्या ठिकाणी आपण या निलगिरी रोपाची लागवड करत आहोत तिथे पाण्याची निचरा करण्याची व्यवस्था असावी.Farming Idea