Farming idea 2022: नमस्कार शेतकरी मित्रांनो या बातमीमध्ये तुम्हाला व्हॅनिला या शेतीबद्दल माहिती सांगणार आहोत व्हॅनिलाची लागवड कशी करायची, व्हॅनिला हे पदार्थ कोणकोणत्या घटकांमध्ये वापरले जाते व ते आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर आहे. हे आपण पाहणार आहोत.
आईस्क्रीम मध्ये असलेला व्हॅनिला फ्लेवर अनेकांना आवडतो. व्हॅनिला फ्लेवर चा वापर हा खाद्यपदार्थांसाठी, केक, आईस्क्रीम बनवण्यासाठी तसेच कोल्डिंग, परफ्युम आणि ब्युटी प्रॉडक्ट यासाठी देखील याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो.
व्हॅनिला ची शेती मादागास्कर, पापुआ न्यू ग्रीन, भारत आणि युगांडा या देशांमध्ये व्हॅनिला ची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. केशर हे पीक महाग आहेच पण त्याचबरोबर व्हॅनिला हे पीक पण महाग आहे. आईस्क्रीम मध्ये 40% व्हॅनिला फ्लेवर चा उपयोग जगभरात होत आहे.व्हॅनिला या उत्पादनाला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. व्हॅनिलाचा सुगंध खूप चांगला असल्यामुळे बजारामध्ये व्हॅनिलाच्या बिया आणि फळाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.Farming idea 2022
व्हॅनिलाची शेती करायची असेल तर, व्हॅनिलाचे उत्पादन घेण्यासाठी तपकिरी माती लागते. मातीमध्ये pH मूल्य 6.5 ते 7.5 असावे लागते. व्हॅनिलाचे उत्पादन घेण्यासाठी बियाची पेरणी करू शकतो. व्हॅनिला या पिकाचे उत्पादन घेतल्यानंतर पिकाला 3 वर्षानंतर फळ येते. या पिकाला फुल येण्यासाठी 9 ते 10 महिने एवढा कालावधी लागतो. रोपामधून बिया काढल्या जातात नंतर त्याचा वापर अन्न बनवण्यासाठी केला जातो.व्हॅनिलाच्या बिया बाजारामध्ये 40000 रुपये ते 50,000 रुपये प्रति किलो विकल्या जातात.
व्हॅनिला हे आरोग्यासाठी एक उत्तम व फायदेशीर घटक आहे. या व्हॅनिला मध्ये फॅमिली व्हॅनिलिन हा रासायनिक घटक असतो, शरीरामधील असलेला कोलेस्ट्रॉल कमी करतो. व तसेच कॅन्सर सारख्या आजारावर व्हॅनिलाच्या बिया आणि फळ खाल्यास फायदेशीर ठरतात. तसेच व्हॅनिलाचे फळ सर्दी, फ्लू आणि पोटाच्या आजारावर नियंत्रण ठेवतो.व प्रतिकार शक्ती वाढवतो. आपण घेतल्यास आपण यामधून लाख रुपये कमवू शकतो व ते आपल्या आरोग्यासाठी उत्तम घटक मनला जातो. हे पीक महागडे असून त्यामधून आपल्याला अधिक नफा मिळू शकतो.Farming idea 2022