Farming idea: पेरूच्या झाडाचे थंडीच्या दिवसांमध्ये नुकसान होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी ते पहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farming idea: नमस्कार मित्रांनो, आम्ही आज तुमच्यासाठी तुमच्या बागेतील पेरूच्या झाडाचे थंडीच्या काळात काळजी कशी घ्यायची, त्यासाठी कोणत्या उपाययोजना करावे लागतील. हे तुम्हाला या लेखात सांगणार आहोत. पेरू थंडीच्या दिवसांमध्ये येतो. थंडीच्या दिवसात पेरूच्या झाडाचे नुकसान होते.

थंडीच्या काळामध्ये वातावरणात बदल होत. या वातावरणामध्ये तापमान हे शून्य अंश सेल्सिअस पेक्षा कमी असते त्यामुळे जमिनीवर प्रकाश पडत नाही अशा परिस्थितीमध्ये पेरूच्या झाडाची मोठ्या प्रमाणात नुकसान होते. पेरूच्या झाडाचे पाने थंडीच्या काळामध्ये पिवळी पडतात. फळ शास्त्रज्ञ डॉक्टर. एस. के. सिंग यांच्या मते, ट्रेस घटकांच्या कमतरते मुळे पेरूचे पाने पिवळी पडतात.

पेरूच्या झाडाचे पाणी पिवळी पडू नये म्हणून त्यावर कॉपर सल्फेट, झिंक सल्फेट, हे मिश्रण प्रति लिटर पाण्यामध्ये 4 ग्रॅम मिसळून झाडावर फवारणी करावी. झाडाचे फळ काढल्यानंतर नॅप्थलीन ऍसिटिक ऍसिड 100 पीपीएम फवारणी करा. नंतर झाडाची कापणी करता वेळेस 10 ते 15 सेमी कापणी केली पाहिजे. जेणेकरून झाडाची वाढ चांगली होते व त्याच बरोबर फळे मोठ्या प्रमाणात येतात.Farming idea

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बागेमधील झाडाचे फळ काढल्यानंतर बागेत साफसफाई करावी लागते. झाडांच्या अडकलेल्या तुटलेल्या फांद्या बाजूला काढून टाकाव्यात बागेमधील गवत काढून बागेमध्ये साफसफाई करून घ्या नंतर झाडांची कापणी केल्यावर त्यावर कॉपर ऑक्सीक्‍लोराईड 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.

पेरूच्या झाडाची लागवड जून जुलै या महिन्यांमध्ये केली जाते. झाडांचे रोप फेब्रुवारी महिन्यात येते. पेरूच्या झाडांची फळे जानेवारी महिन्यात काढन्यात येते. फळाची कापणी आपण सकाळी करू शकतो. पेरूचा रंग गडद ते हलका हिरवा झाला की पेरूची काढणी करावी. पेरू मध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी 6 आढळते. व त्याच बरोबर पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फायबरचे प्रमाण पेरूमध्ये जास्त असते हे आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे.Farming idea

Leave a Comment