Fertilizer Rate Today: नमस्कार मित्रांनो, आपण आज सर्व शेतकऱ्यांसाठी खूपच महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. आता अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीन पिकाची पेरणी आवरली आहे. त्याचबरोबर कापूस पिकाची लागवड देखील अनेक जिल्ह्यांमध्ये झालेली आहे. त्याचबरोबर आता शेतकरी खत खरेदी करण्यासाठी कृषी सेवा केंद्र मध्ये जात आहेत.
मात्र, अनेक शेतकऱ्यांना खताचे नवीन भाव किती आहेत माहित नाही. आणि याच कारणामुळे दुकानदार शेतकऱ्यांना जास्त किमतीत खत विकत आहे. यामुळे शेतकऱ्यांची मोठी फसवणूक होत आहे. ही फसवणूक थांबण्यासाठी राज्य सरकार देखील मोठ्या प्रमाणात खतांच्या किमतीची जाहिरात करत आहे. त्याचबरोबर बोगस बियाण्यावर देखील राज्य सरकार गुन्हे दाखल करत आहे.
आणि जर एखादा दुकानदार शेतकऱ्याला जास्त किमतीत खत विक्री करत असेल तर त्यावर देखील कारवाई केली जाऊ शकते. चला तर मग आजचे खताचे भाव पाहूया, शेतकरी मित्रांनो आपण खालील प्रमाणे खताच्या 50 किलो गोण्याच्या किमती पाहणार आहोत…Fertilizer Rate Today
खताचे नाव | खताची किंमत आणि वजन |
युरिया | 266.50 (50 किलो ग्रॅम) |
डीएपी 18:46:0:0 | 1350 |
एमओपी 0:0:6:0:0 | 1655 ते 1700 |
एनपी 24:24:0:0 | 1500 ते 1700 |
एनपीएस 20:20:0:08 | 1600 |
एनपी एस 20:20:0:13 | 1200 ते 1400 |
एनपीके 19:19:19 | १६५० |
एनपीके10:26:26:0 | १४७० |
एन पी 14:28:0 | १७०० |