Gir Cow: आपण पाहतो की जगात बरेच शेतकरी शेती सोबतच पशुपालन हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात करतात. शेती सोबत पशुपालन हा व्यवसाय करत असताना शेतकऱ्यांना दुप्पट फायदा होत असतो त्यामुळे शेतकरी शेती सोबतच जोडधंदा करण्याकडे वळलेले आहेत. शेती सोबतच पशुपालन हा व्यवसाय जोडधंदा म्हणून करायचा म्हणल्यानंतर शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होतो.
पशुपालन हा व्यवसाय ग्रामीण भागामध्ये सर्वात मोठा उत्पन्नाचा स्रोत म्हणून ओळखला जातो. पशुपालन व्यवसाय करत असताना आपल्याला आपण पाळत असलेल्या गायीची जात कोणती निवडावी व कोणत्या जातीची गाय जास्त प्रमाणात दूध देते हे आपल्याला माहीत असणे अत्यंत गरजेचे आहे. पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती सांगणार आहोत. कोणत्या जातीची गाय पाळली पाहिजे व ती किती लिटर दूध देते त्यापासून आपल्याला किती उत्पन्न मिळते हे आपण या लेखात पाहणार आहोत. आपण जर पशुपालन हा व्यवसाय करत असलो तर याबद्दल शासनही अनेक योजना सुरू करत आहे. नाबार्ड कडून शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायासाठी मदत केली जाते. त्याचबरोबर पशुपालन व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना स्टेट बँक ऑफ इंडिया ही डेअरी उघडण्यासाठी कर्ज देत असते.
पशुपालन हा व्यवसाय करत असताना सर्वात प्रथम प्रश्न हा असतो की आपण कोणत्या जातीची गाय घ्यायला हवी. गायीची जात निवडण्यासाठी आपल्याला खूप विचार करावा लागतो. आपण जी गाय खरेदी करू ती गाय जास्त दूध देईल का? त्यामधून आपल्याला मोठ्या प्रमाणात नफा राहील का?असे प्रश्न आपल्या मनात निर्माण होत असतात. तर अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनो गाई पाळण्यासाठी आपण गिर या गाईची जात निवडू शकता. ही गाय आपल्यासाठी योग्य ठरेल. आपण जर या गाईचे पालन केले तर आपल्याला त्यामधून भरपूर नफा मिळू शकतो.Gir Cow
गीर गायीच्या या जातीमध्ये देव म्हणी आणि स्वर्ण कपिला या प्रजाती सर्वात चांगल्या मानल्या जातात.गिर गायीचे पालन केले तर आपल्याला भरपूर नफा मिळू शकतो. कारण ही गाय एका दिवसात 12 लिटर पेक्षा जास्त दूध देते. गिर गाय नेमकी दिसायला कशी असते हे आपण येथे पाहणार आहोत. चमकदार पांढरा रंग आणि गडद लाल तपकिरी रंगाची गिर गाय असते. या गायीच्या कपाळावर एक फुगवटा आणि कान लांब असतात. शिंगे ही माग वाकलेली असतात आणि त्याचा आकार मध्यम ते मोठ्या पर्यंत बदलतो. या गाई मध्ये भरपूर प्रतिकारशक्ती असते त्यामुळे या जातीच्या गायी कमी प्रमाणात आजारी पडतात.
गीर गाईचे पालन करून शेतकऱ्यांना खूप चांगला नफा मिळू शकतो या गीर गाईचे आयुष्य हे 12 ते 15 वर्षे असते. ही गाय दूध उत्पादनासाठी सर्वात चांगली मानली जाते. ही गाय 12 लिटर दूध दररोज देते तर 360 लिटर दूध 30 दिवसात देते आणि 40000 हजार लिटर दूध वर्षभरात देते. या गाईचा व्यवसाय करून आपण भरपूर नफा मिळू शकतो. तसेच ही गाय आपल्या आयुष्यात 6 ते 12 मुलांना जन्म देखील देते. गीर गायीचे संगोपन करून आपण दूध व्यवसायात लाखो रुपयांचा नफा मिळवू शकतो.Gir Cow