Government new Scheme: नमस्कार मित्रांनो, तुमचे ` नवीन योजना’ या पोर्टलवर अगदी मनापासून स्वागत आहे. आपण या पोर्टलवर सतत नवनवीन योजना, बाजार भाव, नोकरी अपडेट अशी इत्यादी माहिती अचूकपणे पाहत असतो. आज आपण सरकारच्या एका नवीन योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत. ही माहिती तुमच्यासाठी नक्कीच फायद्याची असणार आहे. यामुळे तुम्ही ही बातमी संपूर्ण नक्की वाचा.
सरकार गोरगरीब नागरिकांच्या भविष्याचा त्याचबरोबर परिस्थितीचा विचार करून वेगवेगळ्या योजना राज्यात राबवत आहे. त्याचबरोबर या योजनेचा लाभ घेऊन नागरिक देखील मोठ्या आनंदात राहतात. आता आपण या बातमीत अशा शासनाच्या एका योजनेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत की, या योजनेअंतर्गत नागरिकांना मुलीच्या जन्म झालाकिच 50 हजार रुपये दिले जाणार आहेत.
मित्रांनो, ही योजना केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारकडून राबवली जाणार आहे. या योजनेमार्फत अनेक नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. या योजनेचे नाव हे माझी कन्या भाग्यश्री आहे. या योजनांच्या मार्फत मुलीच्या जन्माच्या वेळी तिच्या पालकांना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून दिली जात आहे.
मित्रांनो माहितीनुसार, ही योजना 1 एप्रिल 2016 रोजी सुरू करण्यात आली होती. परंतु, अनेक गोरगरिबांना या योजनेची माहिती नसल्याने ते या योजनेपासून वंचित राहिले आहेत. परंतु आता आम्ही अशा वेगवेगळ्या योजनेचा लाभ सर्व नागरिकांना मिळावा म्हणून माहिती पाठवण्याचे काम करत आहोत. यामुळे आता जास्तीत जास्त नागरिक सरकारच्या या योजनेचा लाभ घेत आहेत.Government new Scheme
`माझी कन्या भाग्यश्री’ या योजनेच्या अटी नुसार, पालकांना दोन मुली झाल्या तरीदेखील या शासनाच्या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. त्याचबरोबर या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना अर्ज करावा लागणार आहे. परंतु, सरकारने नागरिकांना अर्ज हा खूपच सोप्या पद्धतीने करण्याची संधी दिली आहे. यामुळे अर्ज करण्यासाठी नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
तुम्ही तुमच्या मोबाईलवरून देखील या योजनेचा अर्ज करू शकता. तुम्हाला फक्त सरकारच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी लागणार आहे. अधिकृत वेबसाईट वर गेल्यानंतर तुम्ही माझी कन्या भाग्यश्री या योजनेचा अर्ज फॉर्म डाऊनलोड करा. अर्ज फॉर्म डाऊनलोड केल्यानंतर त्यामधील माहिती व्यवस्थित आणि काळजीपूर्वक भरा. त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रासह तुमचा अर्ज फॉर्म महिला व बाल विकास कार्यालयात जमा करा. यानंतर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाही हे तपासले जाईल. तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला या योजनेअंतर्गत 50 हजार रुपये मिळतील.
या योजनेमध्ये नागरिकांना कोण कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे खालील प्रमाणे संपूर्ण माहिती…
- आधार कार्ड
- मोबाईल नंबर
- मुलीचे किंवा तिच्या आईचे पासबुक
- रहिवासी दाखला
- पासपोर्ट साईज फोटो
- उत्पन्नाचा दाखला
- असे इत्यादी कागदपत्रे या योजनेसाठी लागणार आहेत.
या योजनेमध्ये सर्वात मोठी अट म्हणजे नागरिकांना फक्त दोनच मुली असाव्यात तीन मुले असल्यास तर या योजनेचा लाभ त्या नागरिकाला दिला जाणार नाही. त्याचबरोबर अधिक माहितीसाठी तुम्ही महिला व बाल विकास कार्यालयाशी भेट देऊ शकता.Government new Scheme