Government scheme: नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आम्ही तुमच्यासाठी एक खूपच आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. ही बातमी म्हणजेच आता शेतकऱ्यांना नवीन शासन निर्णयानुसार विहीर खोदकाम करण्यासाठी चार लाख रुपये अनुदान मिळणार आहे. आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत की, या योजनेचा अर्ज कोठे करायचा. कागदपत्रे कोणती लागतात, पात्रता काय आहे अशी संपूर्ण माहिती आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत.
सुरुवातीला आपण या योजनेचे नाव काय आहे पाहूयात- या योजनेचे नाव महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सिंचन विहिरी वरती चार लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे. आणि त्याचबरोबर नवीन शासन निर्णयानुसार या योजनेतील दोन विहिरीतिला अंतराची अट देखील सध्या शिथिल करण्यात आली आहे.
सुरुवातीला या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विहीर विहिरीसाठी तीन लाख रुपये अनुदान देण्यात येत होते. मात्र आता या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदानात वाढ करून चार लाख रुपये मिळणार आहेत. नवीन शासन निर्णयानुसार या योजनेत खूप बदल झाले आहेत.Government scheme
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील मजुरांना रोजगार मेळावा आणि त्याचबरोबर सिंचन क्षेत्रातही वाढ व्हावी या आशेने सरकारकडून या योजनेत नवनवीन बदल करण्यात येत आहेत. आणि त्याचबरोबर सिंचन विहिरीची जास्तीत जास्त कामे देखील केली जात आहेत. माहितीनुसार, भूजल सर्वेक्षण नुसार आपल्या राज्यात आणखीन सुमारे 3 लाख 87 हजार 500 विहिरी खोदता येणार आहेत.
या योजनेचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार
- शेतकरी मित्रांनो, या योजनेचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना घेता येणार आहे हे पाहुयात -अनुसूचित जाती, भटक्या जमाती, जमाती, दारिद्र रेषेखालील शेतकरी, महिला प्रमुख असलेले कुटुंब, शारीरिक विकलांग व्यक्ती प्रमुख असलेली कुटुंबे, जमीन सुधारणाचे लाभार्थी, इंदिरा आवास योजने खालील शेतकरी, सीमांत शेतकरी त्याचबरोबर जे शेतकरी अल्पभूधारक आहेत त्यांनादेखील या योजनेचा लाभ मिळणार आहे.Government scheme