Hawamaan Andaaz Today: महाराष्ट्रात सध्या ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी मुसळधार पाऊस आणि काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडला आहे. राज्यातील वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले असतानाच पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.
भारतीय हवामान खात्याने आपल्या अंदाजात म्हटले आहे की, मध्यरात्रीपर्यंत चक्रीवादळ पश्चिम बंगालमधील सागर भेट आणि बांगलादेशच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. रेमल चक्रीवादळामुळे भारतातील पश्चिम बंगाल, उत्तर ओडिशा, बंगाल त्रिपुरा, दक्षिण मणिपूर, मिझोराममध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात या चक्रीवादामुळे कोणता परिणाम होईल? संपूर्ण माहिती खालील प्रमाणे
भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार, या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर फारसा परिणाम होणार नसून, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे, अशी माहिती समोर आली आहे राज्यात तापमानात वाढ झाल्याने जळगाव आणि अकोल्यात ४५ अंश, संभाजीनगरमध्ये ४३ अंशांपर्यंत तापमान गेले आहे. आणि या वाढत्या तापमानामुळे राज्यभरात पाऊस पडण्याची शक्यता आहे.Hawamaan Andaaz Today