IMD Monsoon Update: नमस्कार मित्रांनो, मान्सून बाबत आत्ताच हवामान विभागाने मोठी माहिती समोर आणली आहे. अनेक वेळा हवामान विभागाचे अंदाज थोड्या प्रमाणात चुकतात. यावर्षी हवामान विभागाने पावसाबद्दल खूपच आत्मविश्वासाने सांगितले होते की यावर्षी देशभरात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल. मात्र पहिल्याच महिन्यात सरासरीपेक्षा तब्बल वीस टक्के पाऊस कमी पडल्याची नोंद झाली आहे.
यामुळे ही एक सर्व शेतकऱ्यांसाठी खूपच धोक्याची घंटा आहे. मित्रांनो आपण पाहत आहोत की, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडलेला नाही. आणि यामुळे अनेक जिल्ह्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे. त्याचबरोबर अनेक जिल्ह्यात तर पाणी संकट देखील आहे. म्हणजेच अनेक जणांना पिण्यासाठी देखील पाणी उपलब्ध नाही.
आणि याच कारणामुळे तज्ञांकडून शेतकऱ्यांना असा सल्ला देण्यात आला आहे की, शेतकऱ्यांनो जोपर्यंत पेरणी योग्य पुरेसा पाऊस पडत नाही तोपर्यंत पेरणी करू नका. अन्यथा दुबार पेरणी करण्याचे संकट देखील आपल्यावर येऊ शकते. त्याचबरोबर महाराष्ट्रभरात मान्सूनचा वेग देखील मंदावला आहे.IMD Monsoon Update
याच पार्श्वभूमीवर पावसानं विश्रांती घेतल्याचे चित्र आपल्या सर्वांनाही पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील पाच दिवसानंतर महाराष्ट्रात मान्सून साठी पोषक वातावरण तयार होईल. आणि त्यानंतरच पावसाचे पुन्हा महाराष्ट्रात धुमधडाक्यात आगमन होईल.
मानसूनन महाराष्ट्रातील जवळपास सर्व भागामध्ये पेरणी योग्य एवढा पाऊस पडलेला आहे मात्र पूर्व विदर्भाला अजून देखील मान्सूनची प्रतीक्षा कायम आहे. आणि यातच आता मान्सूनचा वेग नोंदवल्याने पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांना चिंता वाटू लागली आहे.
त्याचबरोबर मित्रांनो दररोज अपडेट होणारे असाच हवामान अंदाज पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा…IMD Monsoon Update
येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा