Mon. Dec 2nd, 2024
Increase immumity powar
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Increase immumity powar नमस्कार मित्रांनो,हिवाळा सुरू झाला की रोगप्रतिकार शक्ती कमी होते. थंड वातावरणामुळे सर्दी, ताप खोकला यासारखे आजार उद्भवतात. हिवाळ्यामध्ये आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची, आपली रोगप्रतिकारक शक्ती कशी कायम ठेवायची, रोगप्रतिकारशक्ती कमी होऊ नये म्हणून कोणते उपाय योजना करावे लागतील हे आपण पाहणार आहोत.

हिवाळा सुरू झाला की थंडीचे वातावरण होते. अशावेळी आपल्याला अनेक शाररिक समस्या जाणवतात. या वातावरणामध्ये ताप, सर्दी, खोकला बरोबरच आणि दुसऱ्या अनेक समस्या येतात. त्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती चांगली असायला पाहिजे. हिवाळ्यामध्ये आपण ऊबदार कपडे वापरतो. बाहेरून आपण जेवढी ऊब घेता येईल तेवढी घेतो. पण शरीरामध्ये सुद्धा ऊबीची गरज असते. ती उब आपल्या शरीराला मिळणे आवश्यक आहे.

शरीरामधील रोगप्रतिकारशक्ती कमी झाली की, शारीरिक आजार निर्माण होतात. शारीरिक आजार रोखण्यासाठी शरीरामध्ये प्रतिकारशक्ती असणे गरजेचे आहे. शरीरात रोगप्रतिकारशक्ती भरपूर प्रमाणात असेल तर कोणत्याही प्रकारचे आजार होत नाहीत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

थंड हवामान मध्ये आपल्या शरीराला कसे तंदूरस्त ठेवायचे व रोगप्रतिकारशक्ती कशी वाढायची आपण पाहूया. हिवाळ्यामध्ये आपल्या शरीरामधील पाणी कमी असल्यामुळे शरीरातील प्रतिकारशक्ती कमी होते. आपल्या शरीराला हिवाळ्यामध्ये भरपूर पाण्याची गरज असते. पाणी पिल्याने आपल्या शरीरामधील रोगप्रतिकारशक्ती वाढते. भरपूर पाणी पिल्याने आपली त्वचा त्याचबरोबर केस व्यवस्थित राहतात. पाणी पिल्याने आपली पाण्याची पातळी वाढते. रोज कमीत कमी आठ ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे. हायड्रेशन हे तुमच्या शरीरात असणारी रोगप्रतिकार पेशीचा प्रसार होऊन संक्रमणाशी लढा देतो.

प्रतिकारशक्ती चांगली रहावी म्हणून भरपूर सकस आहार घ्यावा आहारामध्ये कधी कार्बनयुक्त आपल्या आहारातून येतात. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी विटामिन – सी विटामिन – ई आणि विटामिन – बी6 ची गरज असते. फ्लू आणि सर्दीच्या आजारावर नियंत्रण ठेवते. आपल्या शरीराच्या निरोगी चरबीसाठी आपण आपल्या आहारामध्ये फळे आणि संपूर्ण धान्य घेणे आवश्यक आहे.

थंडीच्या दिवसांमध्ये रोग प्रतिकार शक्ती चांगली ठेवायची असेल तर आपले झोप होणे खूप गरज आहे. झोप घेतल्यानंतर आपल्या शरीराला आराम मिळतो. झोप घेतल्या मुळे प्रतिकारशक्ती वाढते. झोपेच्या 1 तास आदी मोबाईल, लॅपटॉप, कम्प्युटर, बंद करून ठेवावे.Increase immumity powar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *