Ladki bahin yojana: महाराष्ट्र राज्य सरकारने लाडकी बहीण योजना आम्लात आणली आहे. ही योजना महिलांसाठी आहे. या योजनेअंतर्गत महिला सशक्तीकरणा साठी एक महत्त्वाचा पाऊल आहे. या योजनेचा पहिला हप्ता लवकरच जमा होणार आहे. त्यामुळे ज्या महिलांनी या योजनेचा अर्ज केला नाही त्यांनी लवकरात लवकर करावा. हा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. त्याबद्दलची संपूर्ण माहिती आणि दिली आहे तर आपण ही माहिती संपूर्णपणे जाणून घेऊया.
माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता 15 ऑगस्ट 2024 रोजी महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. आत्तापर्यंत 15 लाख महिलांनी या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरले आहेत. परंतु ज्या महिलांनी अर्ज अजूनही भरलेले नाहीत त्यांनी लवकरात लवकर भरून घ्यावे. अर्ज करण्याची संधी उपलब्ध आहे. परंतु लवकरच या योजनेसाठी एक विशेष ऑनलाईन पोल्टर सुरू करण्यात येणार आहे. म्हणून या योजनेचा अधिकाधिक महिलांना योजनेचा लाभ घेता येईल.
ज्या महिला योजनेसाठी पात्र ठरले आहेत त्यांची यादी लवकरच म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. आणि या यादीमध्ये महिलांना काही अडचण आल्यास ती दूर करण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात येईल. आणि नंतर दुसरी यादी ही जाहीर केली जाईल आणि दोन्ही याद्याचे पैसे एकत्र बँक खात्यात जमा केले जाते.
योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत ते लवकरात लवकर सादर करावेत.
- महिलांचे आधार कार्ड रहिवासी दाखला किंवा 15 वर्षाचे राशन कार्ड / मतदान कार्ड / शाळा सोडल्याचा दाखला
- 2.5 लाख रुपये पेक्षा कमी वार्षिक अन्नाचा दाखला
- हमीपत्र
- बँक पासबुक Ladki bahin yojana