Land records: शेतीच्या बांधावरून अनेकदा भांडणे सुरू असतात. हे आपण अनेकदा ऐकले असेल. परंतु वडिलोपार्जित जमीन कोणाच्या नावावर आहे हे नक्की माहीत नसल्यामुळे अनेक जणांची भांडणे होतात. म्हणजे भावाभावात भांडणे होतात. भावकी-भावकीमध्ये भांडण होतात अशा इत्यादी जणांमध्ये भांडण होतात. यामुळे डिजिटल पद्धतीने शेत जमीन कोणाच्या नावावर आहे हे पाहण्यासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे.
https://bhulekh.mahabhumi.gov.in/ या अधिकृत साईटच्या मदतीने तुम्ही शेत जमीन कोणाच्या नावावर आहे. हे सहज पाहू शकता. यामुळे अनेकांचे जीवन सुरळीत चालू शकते. त्याच बरोबर अनेक जण आपलं संपूर्ण आयुष्य जमीन माझी माझी करत भांडण करत राहतात. आणि हा वाद मोठा होऊन हाणामाऱ्या होतात. यामुळे अनेकांना कोर्टामध्ये देखील दाखवलं व्हावे लागते. अशी कोणतीही आता तक्रार आली नाही पाहिजे यामुळे सरकारकडून अधिकृत पोर्टल म्हणजेच साईट तयार करण्यात आले आहे.
या अधिकृत पोर्टलवर तुम्हाला जमीन कोणाच्या नावावर आहे. त्याच्या अगोदर जमीन कोणाच्या नावावर होती. जमिनीचा किती भाग तुमचा आहे. शेजाऱ्याने बांध कोरला तर नाही अशी संपूर्ण माहिती जमिनी बाबत तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे.
अनेकदा असे घडते की, जमीन कोणाच्या नावावर आहे ही माहित नसल्याने सर्वांमध्येच गोंधळ निर्माण होतो. आणि त्यावरून भांडणे सुरू होतात. यामुळे तुम्हाला जमीन कोणाच्या नावावर आहे हे शोधण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागते. परंतु आता तुम्ही तुमच्या मोबाईलवरून पाहू शकता की जमीन कोणाच्या नावावर आहे. तेही काही मिनिटांमध्ये तुम्हाला याची संपूर्ण माहिती मिळणार आहे.
तुम्हाला जमिनीचा पूर्वीचा संपूर्ण इतिहास या अधिकृत पोर्टलवर दिला जाणार आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांची त्याचबरोबर नागरिकांची फसवणूक देखील कमी होईल. त्याचबरोबर भांडणे देखील कमी होतील म्हणजेच कालांतराने ती नष्ट होऊन जातील. जमिनी संबंधित ही संपूर्ण माहिती अभीलेखांमध्ये लिहिलेली आहे. त्याचबरोबर तुम्ही अभिलेखांच्या अधिकृत पोर्टलवर ही माहीती तुमच्या मोबाईलवरून पाहू नका.