Lokmat News: मागील पंधरा दिवसांपूर्वी जिल्ह्यातील अनेक भागात पेरणी योग्य पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांची लागवड केली आहे. आता शेतकरी खते खरेदी करण्याच्या तयारीत आहेत. परंतु या हंगामात अनेक बोगस खत विक्रेते खताच्या किमतीत जास्त प्रमाण करतात तसेच हातामध्येही भेसळ केली जाते.
सामान्य शेतकऱ्यांना युरिया खताची किंमत परवडण्यासारखी आहे परंतु 10:26:26 डीपी एमओपी या खतांच्या किमतीत जवळपास 1300 ते पंधराशे रुपये पर्यंत गेल्या आहेत मात्र खते करताना शेतकऱ्यांनी अधिकृत हत्याकडून रीतसर पावती घेऊनच खरेदी करावी. स्वतःच्या खरेदीची पावती पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावी.
भेसळीची शंका दूर करण्यासाठी स्वतःची पाकिटे व गोणी सील बंद असल्याची खात्री करावी कमी वजनाच्या निविष्ठा तसेच छापील किमतीपेक्षा जास्त किमतीने खताची विक्री सुरू असेल तर कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा
दरम्यान, कृषी विभागामार्फत खत किंवा बियाणे विक्रेते वर कारवाई केली जाते. शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. Lokmat News