Maharashtra Temperature News: सध्या देशभरात उष्णता ही दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचबरोबर अनेक जिल्ह्यात आणि देशातील प्रमुख शहरांमध्ये तापमानाने नवीन रेकॉर्ड केले आहे. महत्त्वाचे म्हणजे काल दिल्लीमध्ये 52.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. आणि त्याचबरोबर दिल्लीमधील मंगेश पूर या ठिकाणी आज पुन्हा 49.9 अंश तापमानाची नोंद झाली आहे. त्याचबरोबर या उष्णतेने अनेक जण आजारी देखील पडत आहेत.
त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रामध्ये उष्णतेमुळे आतापर्यंत माहितीनुसार दहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर उष्माघात होणाऱ्या रुग्णांची देखील संख्या महाराष्ट्रभरात मोठ्या सपाट्याने वाढत आहे.
त्याचबरोबर मित्रांनो आपल्या महाराष्ट्र मध्ये देखील काल अनेक जिल्ह्याचे तापमान हे 40 पार झाले होते. त्याचबरोबर काही जिल्ह्यात 43 अंश सेल्सिअस ते 44 अंश सेल्सिअस तापमान देखील झाले होते. त्याचबरोबर पुढील काही दिवस अजून तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने देखील वर्तवली आहे.Maharashtra Temperature News
त्याचबरोबर हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन ते तीन दिवस राजस्थान तसेच गुजरात मधून उष्ण वारे आपल्या राज्यामध्ये येणार आहे. त्याचबरोबर या उष्णतेमुळे तसेच बदलत्या वातावरणामुळे राज्यभरात अवकाळी पावसाची शक्यता देखील खूपच कमी झाली आहे.
चला तर मग कोणत्या जिल्ह्यात किती अंश सेल्सिअस तापमानाची नोंद काल झाली आहे खालीलप्रमाणे पाहूयात…
- पुणे: 41.3 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.
- अकोला: 41.3 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली
- नागपूर : 37.4 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली
- छत्रपती संभाजी नगर मध्ये 40.7 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली
- नांदेड मध्ये 42.4 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली
- जळगाव मध्ये 42.2 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली
- कोल्हापूर मध्ये 40.2 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली
- महाबळेश्वर या ठिकाणी 34.1 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली
- सोलापूर या जिल्ह्यात 43.7 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली
- मुंबई मध्ये 34.4 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली
- रत्नागिरी मध्ये 34.0 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.Maharashtra Temperature News