Nuksan Bharpai: शेतकऱ्याचे झाले मोठ्या प्रमाणात नुकसान पहा कधी व किती मिळणार नुकसान भरपाई

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Nuksan Bharpai: शेतकरी मित्रांनो, आज आपण या बातमीमध्ये शेतामधील शेत पिकांची झालेली नुकसान भरपाई मिळणार का नाही व ती कधी मिळणार हे आपण या बातमीमध्ये आपण पाहणार आहोत.

महाराष्ट्र राज्यातील अनेक ठिकाणी वन्यप्राण्यांनी शेतकऱ्याला संकटात टाकले आहे. वन्य प्राणी शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान करत असल्यामुळे शेतामधील आलेला पिकाची नासाडी होत आहे. 

शेतामध्ये पीक पेरणीच्या वेळेस पावसाचे प्रमाण हे कमी असल्यामुळे पिकांची योग्य ती वाढ झाली नाही. त्यामुळे पीक सुकून गेल्यासारखे झाले होते. पण नंतर प्रमाणा पेक्षा जास्त पाऊस पडल्यामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले. खरीप हंगामा मधील बाजरी,मुग,मका यासारखे पिके नष्ट झाली आहे. पिकांचे पंचनामे सुरु असून पिकाची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकर वितरित व्हावी असे सर्व शेतकऱ्यांना वाटत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शेतामध्ये शेतकरी दिवस रात्र राबतात आणि वन्य प्राणी येऊन पिकांची नासाडी करतात. पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकरी आतोनात प्रयत्न करत आहेत.Nuksan Bharpai

ज्या पिकांचे नुकसान अतिवृष्टीने झाले त्या पिकांना ग्रामपंचायत, कृषी विभागाने पंचनामे केले आहे. काही पिकांची नुकसान पावसामुळे झाली नाही. पण वन्य प्राणी पिकांचे नुकसान करत आहे. एका पिकांसाठी दोन वेळेस पंचनामे सरकार मान्य करत नाही त्यामुळे या पिकांचे पंचनामे होत नाही.

शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांपासून झालेल्या शेती पिकाची नुकसान भरपाई मिळत नाही. नुकसान भरपाई मिळणे शेतकऱ्यांसाठी आवश्यक आहे. शासन शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे. सरकारने या प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाला आदेश दिले पाहिजेत. या वन्य प्राण्यांपासून शेतकऱ्यांच्या पिकाचे खूपच नुकसान होत असल्याचे दिसत आहे. शेतकऱ्यांनी केलेल्या बागेमध्ये रानडुक्कर झाडांची मुळे उकरून झाडाची नुकसान करतात.Nuksan Bharpai

Leave a Comment