Mon. Nov 18th, 2024
Pik Vima Mafi
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pik Vima Mafi: नमस्कार मित्रांनो, केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे व मागील हंगामात पडलेल्या दुष्काळामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आला आहे. त्याचबरोबर मागील वर्षी निसर्गाच्या कृपेमुळे शेतकऱ्याला पीक कर्ज भरता आले नाही.

यामुळे शेतकऱ्याचे पीक कर्ज सरसकट माफ व्हावे यासह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर अखिल भारतीय किसान सगळीकडून शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले होते.

त्याचबरोबर मागील हंगामातील सोयाबीन पिकाचा उर्वरित पीक विमा आणखीन देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेला नाही. यामुळे रब्बी पीक विम्याचे तात्काळ वाटप शेतकऱ्यांना करण्यात यावे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सध्या शेतकरी पेरणी आणि खत-खरूपणीच्या कामात व्यस्त आहेत. त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांना पेरणी तसेच खत-खुरपणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक भार सोसावा लागत आहे. यामुळे सरकारने 15 जुलै पूर्वी जो शेतकरी कर्जाची मागणी करेल त्याला कोणतीही अट न ठेवता पीक कर्ज द्यावे.

आणि त्याचबरोबर नियमित ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्जाची परतफेड केली आहे आणि ज्या शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीमुळे पीक कर्जाची परतफेड करता आलेली नाही. अशा सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी अशी मागणी किसान सभा अध्यक्ष यांच्याकडून करण्यात आलेली आहे.Pik Vima Mafi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *