Pik Vima Yadi: शेतकऱ्यांनो, सरकारकडून अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम पाठवली गेली आहे. परंतु अनेक शेतकऱ्यांना या पिक विमा योजनेचा लाभ मिळाला नाही. म्हणजेच काही शेतकऱ्यांनी पिक विमा भरला होता मात्र त्यांना आर्थिक मदत मिळाली नाही. चला तर मग आज आपण या बातमीत तुमच्या अर्जाची स्थिती आणि पिक विमा लाभार्थी यादी पाहूयात.
सरकारने आताच काही दिवसांपूर्वी काही जिल्ह्यांसाठी 25 टक्के पीक विमा लागू केला होता. आणि त्याचबरोबर बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यात 25 टक्के पीक विम्याची रक्कम पाठवली गेली होती. परंतु अनेक शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही. पिक विमा मिळण्याचे मुख्य कारण काय आहे हे आपण पुढील प्रमाणे पाहूयात.
तुम्हाला जर पिक विमा मिळाला नसेल तर तुम्ही लगेच तुमची पिक विमा स्थिती चेक करा. जेव्हा तुम्ही पिक विमा फॉर्म भरला होता तेव्हा तुम्हाला एक पावती मिळाली होती जर ती पावती तुमच्यापाशी असेल तर तुम्ही ती पावती तपासू शकता. म्हणजे तुम्हाला तुमचा पिक विमा का मिळाला नाही किंवा कोणत्या बँकेतून तुम्हाला मिळाला आहे. अशी संपूर्ण माहिती तुम्ही त्या पावती पाहू शकता.
पिक विमा योजनेची तुमची स्थिती कशी पहायची हे आपण पुढील प्रमाणे पाहूयात, मित्रांनो तुम्ही सुरुवातीला pmfby.gov.inया सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. त्यानंतर तुम्हाला सरकारचे मुख्यपृष्ठ भाग दिसेल मग तुम्ही तिथे दिलेल्या PMFBY या पर्याय वर क्लिक करा. त्यानंतर तुम्ही तुमची माहिती म्हणजेच तुमचा कोणता जिल्हा आहे, त्याचबरोबर राज्य आणि हंगाम निवडा. त्यानंतर तुम्हाला तुमची पीक विम्याची स्थिती दिसेल.Pik Vima Yadi
मित्रांनो, सरकारकडून हा पिक विमा शेतकऱ्यांना थोडी का होईना आर्थिक दिलासा मिळावा म्हणून दिला जात असतो. या योजनेतून लाखो शेतकऱ्यांना लाभ दिला जात आहे. मात्र काही आर्थिक संकटांमुळे शेतकऱ्यांना देखील पिक विमा मिळण्यास उशीर होत आहे. परंतु सर्व शेतकऱ्यांना पिक विमा दिला जाईल. अशी अपेक्षा आपण करूयात.
त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर पिक विमा लाभार्थी यादी पहायची असेल तर तुम्ही pmfby.gov.in या लिंक वर क्लिक करून लाभार्थी यादी पाहू शकता.Pik Vima Yadi