pik vima: नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण या बातमीमध्ये पिक विमा संदर्भात महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. ही माहिती तुमच्यासाठी खूपच उपयुक्त असेल. आता शेतकऱ्यांना पीक विमा लवकरच मिळणार आहे. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी ही महत्वपूर्ण माहिती 10 नोव्हेंबर रोजी आढावा बैठकीत दिली आहे.
कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी बैठकीत घेतलेला निर्णय पुढील प्रमाणे पाहुयात, 8 दिवसाच्या आत शेतकऱ्यांना पीक विमा त्यांच्या खात्यावर जमा करावा अशी सूचना अब्दुल सत्तार यांनी संबंधितांना दिल्या होत्या. खरीप हंगामामध्ये शेतकरी बांधवांचे अतिवृष्टीमुळे पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याकरिता नुकसान भरपाई मिळावी म्हणून प्रधानमंत्री फसल बीमा योजना अंतर्गत अनेक शेतकरी त्यांच्या शेतातील पिकांचा पिक विमा काढलेला आहे.
सरकारने दिलेल्या आदेशाप्रमाणे अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातील नुकसान झालेल्या पिकांचे क्लेम देखील पिक विमा कंपनीस केलेलं आहे. तरीदेखील अनेक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नुकसान भरपाई जमा झाली नाही.pik vima
हे पण वाचा👉शेतकऱ्याचे झाले मोठ्या प्रमाणात नुकसान पहा कधी व किती मिळणार नुकसान भरपाई
शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत
शेतकऱ्यांना पीक विमा देण्यासाठी खूपच उशीर होत आहे यामुळे आता येत्या पाच दिवसात कारवाही करून पुढील आठ दिवसाच्या आत मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम ट्रांसफर करावी, अशी सूचना राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी 10 नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी संबंधितांना दिल्या होत्या.
त्याचबरोबर पीक विम्याचे पैसे जर शेतकऱ्यांना लवकर मिळाले नाही तर, चालढकल करणाऱ्या विमा कंपन्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. असा इशारा देखील राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.pik vima