PM Kisan Yojana: नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसान सन्माननिधी योजनेचा 18 वा हप्ता कधी येणार याबद्दल महत्त्वाची माहिती सरकारने जाहीर केलेली आहे. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 17 वा हप्ता देण्यात आला होता. त्याचबरोबर अवकाळी पावसामुळे त्याचबरोबर शेतकऱ्यांना शेतीला खत पाणी देण्यासाठी लागणारा खर्च पाहता सरकारकडून लवकरच पीएम किसान योजनेचा 18 वा हप्ता शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.
पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता शेतकऱ्यांना 18 जून 2024 रोजी देण्यात आला होता. आणि या योजनेचा लाभ सर्व पीएम किसान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना मिळाला होता. आणि या मिळालेल्या पैशांमुळे शेतकऱ्यांना बी बियाणे खरेदी करण्यासाठी मोठा दिलासा मिळाला होता. त्याचबरोबर आता शेतकऱ्यांना अठरावा हप्ता कधी मिळणार याची आतुरता आहे. चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती…PM Kisan Yojana
अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात. हे सहा हजार रुपये शेतकऱ्यांना प्रत्येकी चार महिन्यांच्या अंतरावर दोन दोन हजार रुपये असे करून दिले जातात. आताच 18 जून रोजी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे पैसे मिळाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना नियमानुसार ऑक्टोबर महिन्यात अठराव्या हफ्त्याचे पैसे मिळतील.
परंतु शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेता. त्याचबरोबर वाढती महागाई समोर ठेवून मोदी सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात अठरावा हप्ता शेतकऱ्यांना देण्यासाठी 20000 करोड रुपयांची तरतूद केली आहे. आणि हे पैसे शेतकऱ्यांना पुढील महिन्यात 7 तारखेला दिले जाऊ शकतात. परंतु याबाबत सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही. यामुळे ही तारीख निश्चित आहे असे म्हणता येणार नाही…PM Kisan Yojana
पी एम किसान योजनेची लाभार्थी यादी येथे क्लिक करून पहा