PM Kisan Yojana: नमस्कार शेतकरी मित्रांनो, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांना 17 हप्ते जमा करण्यात आले आहेत. त्याचबरोबर आता लवकरच शेतकऱ्यांना 18 वा हप्ता दिला जाणार आहे. आणि या हप्त्यासाठी किती शेतकरी पात्र आहेत यांची यादी देखील सरकारने अधिकृत पोर्टलवर प्रसिद्ध केले आहे. यामुळे जे शेतकरी पात्र आहेत ते शेतकरी या योजनेच्या लाभार्थी यादी मध्ये नाव पाहू शकतात.
त्याचबरोबर अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या चुका दुरुस्त करून पुन्हा या योजनेचा लाभ देखील घेता येऊ शकतो. पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात. हे सहा हजार रुपये शेतकऱ्यांना तीन टप्प्यात दिले जातात आणि हे तीन टप्पे चार महिन्यांच्या अंतरावर ठरवले जातात.PM Kisan Yojana
त्याचबरोबर या योजनेचा लाभ घेऊन लाखो शेतकरी आर्थिकदृष्ट्या मजबूत होत आहेत. त्याचबरोबर आपल्या राज्य सरकारने नमो शेतकरी योजना सुरू केली आहे. आणि या योजनेअंतर्गत देखील लाभार्थी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये वार्षिक दिले जाणार आहेत. यामुळे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना दुहेरी फायदा होणार आहे.
त्याचबरोबर शिंदे सरकारने आता पुन्हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. यामुळे राज्यातील सर्व सुशिक्षित 21 ते 65 वयोगटातील महिलांना 1500 दर महिन्याला दिले जाणार आहेत. यामुळे महिलांना देखील मोठी आर्थिक मदत होणार आहे.
त्याचबरोबर मित्रांनो माहितीनुसार पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता हा 15 ऑगस्ट या तारखे दरम्यान दिला जाऊ शकतो. त्याचबरोबर तुम्ही पीएम किसान योजनेची लाभार्थी यादी खालील प्रमाणे पाहू शकता….PM Kisan Yojana
पीएम किसान लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा