Pm kisan yojana: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज या बातमीत पी एम किसान योजनेचा 13 वा हप्ता किती तारखेला येणार, कोणत्या शेतकऱ्यांना मिळणारा या योजनेचा लाभ अशी संपूर्ण माहिती आपण या बातमीत पाहणार आहोत.
शेतकऱ्याला आर्थिक सहाय्य देण्यासाठी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पी एम किसान योजना राबवण्यासाठी सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 12 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. आता सर्व शेतकऱ्यांना 13 वा हप्ता कधी येईल याच्या प्रतीक्षेत आहेत.
शेतकरी मित्रांनो, पी एम किसान योजनेचा 13 वा हप्ता हा नवीन वर्ष सुरू होण्याअगोदर म्हणजेच 31 डिसेंबर अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाऊ शकतो. त्याचबरोबर या योजनेमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. यामुळे नेक अपात्र शेतकर्यांना या या योजनेतून वगळले आहे.Pm kisan yojana
मित्रांनो, या योजनेअंतर्गत एका वर्षात सहा हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते. हे मदत शेतकऱ्यांना तीन हप्त्यामध्ये दिले जाते. पहिला हप्ता हा 1 एप्रिल ते 31 जुलै दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जातो. दुसरा हप्ता हा 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जातो. त्याचबरोबर तिसरा हप्ता हा 1 डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात पाठविला जातो. यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात डिसेंबर महिन्यामध्ये 13 व्या त्याचे पैसे जमा होऊ शकतात.
शेतकरी मित्रांनो, पी एम किसान योजनेचा बारावा हप्ता शेतकऱ्यांना 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर दरम्यान दिला जातो. परंतु, सरकारकडून 12 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्यासाठी तब्बल एक महिना उशीर झाला होता. यामागील कारण म्हणजे शेतकऱ्यांनी ई-केवायसी ही पूर्ण केली नव्हती. त्याचबरोबर या योजनेत अनेक बदल करण्यात आले होते यामुळे बारावा हप्ता हा शेतकऱ्यांना उशिरा मिळाला.
शेतकरी मित्रांनो, माहितीनुसार आता ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी ही पूर्ण केली आहे. अशाच शेतकऱ्यांना 13 वा हप्ता दिला जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी ही पूर्ण केली नाही अशा शेतकऱ्यांना या योजनेतून वगळले जाणार आहे. यामुळे तुम्ही ई-केवायसी केली नसेल तर लवकरात लवकर तुमची ई-केवायसी करून घ्या.
तुम्हाला जर या योजनेमध्ये काही अडचण येत असेल तर तुम्ही फक्त मिस कॉल द्वारे देखील तुमची समस्या जाणून घेऊ शकता. किंवा तुमचा जो काही प्रश्न आहे तो विचारू शकता. आम्ही खालील प्रमाणे अधिकृत नंबर दिलेले आहेत. त्या नंबर वर तुम्ही कॉल करून किंवा मिस कॉल देऊन सर्व काही माहिती घेऊ शकता.
हेल्पलाइन नंबर – 155261, 1800115526
टोल फ्री नंबर – 011-23281092
वरील दिलेल्या कोणत्याही नंबर वर तुम्ही कॉल करून किंवा मिस कॉल देऊन तुमच्या अडचणी किंवा समस्या त्यांना विचारू शकता.Pm kisan yojana