Pm kisan Yojana: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज या बातमीत पी एम किसान योजना संबंधित महत्वपूर्ण माहिती पाहणार आहोत. ती माहिती म्हणजेच 13 व्या हप्ता त्याबाबत आहे. पी एम किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांना 12 हप्ते मिळाले आहेत. या योजनेचा लाभ देशातील कोट्यावधी शेतकरी घेत आहेत.
मित्रांनो आता या योजनेतून काही अवैद्य शेतकऱ्यांना वगळण्यात येणार आहे. यामुळे सरकारने 12 वा हप्ता मिळवण्यासाठी काही अटी शेतकऱ्यांपुढे ठेवल्या होत्या. त्या अटीचे पालन करून अनेक शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता. मात्र जे शेतकरी या अटीचे पालन करु शकले नाहीत. त्यांना पी एम किसान योजना अंतर्गत दोन हजार रुपये मिळाले नाहीत.
त्याचबरोबर आता मिळालेल्या माहितीनुसार 13व्या हप्ता त्याचा लाभ हा देशातील सुमारे 1.86 कोटी शेतकऱ्यांना मिळणार नाही. सरकारने दिलेल्या माहितीनुसार, 12 हप्ता त्यानंतर केंद्र सरकारने शेतकऱ्यांचा डेटा साफ करण्यासाठी आधार लिंक फिल्टर लागू केले आहे. यानंतर जवळपास दोन कोटी शेतकऱ्यांची पी एम किसान योजनेच्या यादीतून नावे वगळण्यात आले आहेत.Pm kisan Yojana
अधिकृत माहितीनुसार, अकराव्या हप्त्याचा लाभ 10.45 कोटी पात्र शेतकऱ्यांना दिला होता. परंतु, बाराव्या हप्त्याचा लाभ हा फक्त 8.58 कोटी देण्यात आला होता. त्यानंतर आता सरकारला शेतकऱ्यांना तेरावा हप्ता देण्याची वेळ आली आहे. त्याचबरोबर सरकारने जाहीर केलेल्या यादीनुसार या तेराव्या हप्त्याचा लाभ हा जवळपास 1.86 कोटी शेतकऱ्यांना देण्यात येणार नाही.
त्याचबरोबर शेतकऱ्यांना तेराव्या हप्त्याचे दोन हजार रुपये नवीन वर्षात दिले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. या अगोदर तुम्ही लवकर पहा की पी एम किसान योजनेचा तुम्हाला लाभ दिला जाणार आहे की नाही?
अधिकृत माहितीनुसार, ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत फसव्या पद्धतीने पी एम किसान योजनेचा लाभ घेतला आहे. अशा शेतकऱ्यांना कठोर शिक्षा केली जाणार आहे. त्याचबरोबर त्या शेतकऱ्याकडून या योजनेचा लाभ घेतलेली रक्कम देखील वसूल करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी आपले खाते म्हणजेच किसान सम्मान निधि हे खाते आधार कार्डशी लिंक केलेले नाही. अशा शेतकऱ्यांना देखील पी एम किसान योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
यामुळे तुम्ही देखील किसान सन्मान निधी खाते आधार लिंक केलेले आहे की नाही हे नक्की तपासा. तुम्ही जर तुमचे खाते आधार लिंक केले नसेल तर त्वरित आधार कार्डशी तुमचे खाते लिंक करून घ्या. अन्यथा सरकारने दिलेल्या माहितीनुसार, तुम्हाला या योजनेतून वगळण्यात येईल.
चला तर मग आता पाहूयात की कोणत्या ठिकाणाहून किती पात्र शेतकरी ठरले आहेत.
शेतकरी मित्रांनो, आधार लिंक फिल्टर केल्यानंतर यूपीतील जवळपास 58 लाख शेतकरी पी एम किसान या योजनेतून वगळण्यात आले आहेत. त्याचबरोबर पंजाब मधील जवळपास 2 लाख शेतकरी वगळण्यात आले आहेत. त्याचवेळी केरळ व राजस्थानमधील जवळपास 14 लाखांहून अधिक शेतकऱ्यांचे पी एम किसान योजनेचे नाव रद्द करण्यात आले आहेत. त्याचबरोबर सर्व देशातील एकूण 1.86 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.Pm kisan Yojana