pm kisan yojna: नमस्कार मित्रांनो, नवीन योजना या न्यूज पोर्टल वर तुमचे अगदी मनापासून स्वागत. आपण न्यूज पोर्टलवर दररोज नवनवीन योजना, बाजार भाव, नोकरी अपडेट अशी इत्यादी माहिती पाहत असतो. त्याचबरोबर आज आपण पी एम किसान योजना बद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजना अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात. या योजनेसाठी दरवर्षी नवीन नाव नोंदणी सुरु असते. त्याचबरोबर या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना वर्षातून तीन टप्प्यांत दिला जातो. प्रत्येकी टप्प्यात दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले जातात.pm kisan yojna
त्याचबरोबर शेतकऱ्यांनो,आतापर्यंत या योजनेअंतर्गत 12 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. ही योजना 2018 मध्ये केंद्र सरकारने राबवण्यासाठी सुरुवात केली आहे. त्याचबरोबर आता या योजनेचा 13 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे.
परंतु त्या अगोदर शेतकऱ्यांसाठी एक वाईट बातमी आहे. ती बातमी म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी जमीन पडताळणी केली नाही अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. यामुळे तुम्ही लवकरात लवकर तुमच्या जवळच्या कृषी कार्यालयात जाऊन तुमच्या जमिनीच्या नोंदी सत्यापित करू शकता.
त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केली नाही अशा शेतकऱ्यांना देखील या वेळेचा लाभ दिला जाणार नाही. यामुळे तुम्ही हे दोन्ही काम लवकरात लवकर करून घ्यावे. हे दोन्ही काम पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला 13 वा हप्ता दिला जाऊ शकतो.pm kisan yojna