Remedy for dry skin: नमस्कार मित्रांनो, हिवाळ्यामध्ये त्वचा कोरडी पडते. त्वचा ओढून झाल्यासारखी होते. त्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक उपाय केल्यास त्वचेचा ओलावा कायम टिकून राहतो. त्वचा कोरडी होऊ नये. म्हणून नैसर्गिक उपाय करतात. उपाय केल्यामुळे त्वचा तेजस्वी दिसते.
चेहरा नेहमी स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. आपण नैसर्गिक उपाय करून चेहऱ्याची स्वच्छता ठेवू शकतो. स्वच्छतेमुळे त्वचा चांगली राहते. त्वचा कोरडी पडते म्हणून आपण कोरफडीचा गर चेहऱ्यावर लावून थोडा वेळ मसाज करायचा. कोरफडीचा गळा लावण्याआधी चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचा नंतर कोरफडीचा गळा चेहऱ्याला लावायचा. आणि 2 मिनिटं मसाज करून नंतर चेहरा स्वच्छ धुऊन घ्यायचा. यामुळे चेहरा मऊ होऊन चेहऱ्यावरील आद्रता टिकवण्यास मदत होईल.
हिवाळ्यामध्ये त्वचा कोरडी होऊ नये म्हणून आणि चेहऱ्याची स्वच्छतेसाठी चेहऱ्यावर दही लावणे फायदेशीर आहे. दही लावल्यावर चेहरा मऊ आणि गोरा होतो आणि त्वचेवरील कोरडेपणा निघून जातो. दही चेहऱ्यावर लावून 2 ते 3 मिनिटं मसाज करा. नंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन घ्या.
दूध हे शरीरासाठी अत्यंत आवश्यक असते. दुधामध्ये असणारे उपयुक्त घटक शरीराला पोहोचले तर आपले शरीर तंदुरुस्त राहते. त्याशिवाय दूध आपण चेहऱ्याला लावले तर याचा फायदा आपल्या त्वचेवर होतो. आपण चेहऱ्यावर कच्च दूध लावू शकतो. 2 ते 3 चमचे कच्चे दूध कापसाच्या बोळ्याच्या मदतीने चेहऱ्यावर अलगद लावून 30 मिनिटे ठेवून. चेहरा स्वच्छ धुऊन घ्यायचं. दुधामध्ये जास्त प्रमाणात ओलावा असतो. त्यामुळे कच्चे दूध चेहऱ्यावर ओलावा कायम टिकून ठेवतो.
आपल्या चेहऱ्यावर डाग, पुटकुळ्या, आणखीन स्किन समस्या येत असतात, त्यामुळे आपण यावर वेगवेगळे उपाय करत असतो. आपण हा एक नैसर्गिक उपाय पाहणार आहोत. की, एका बटाट्याचे पेस्ट काढून गाळून घेऊन त्याचा रस चेहऱ्याला लावला आणि 5 मिनिटांनी थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन घेतला तर चेहऱ्यावरील येणारे फुटकुळ्या, डाग नाहीसे होतात आणि चेहरा उजळतो.Remedy for dry skin