soyabean news: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज या बातमीत सोयाबीन पिकाची पेरणी कोणत्या वाणाची केल्यानंतर शेतकऱ्यांना जास्त उत्पादन मिळेल याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. तुम्ही जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर ही बातमी शेवटपर्यंत नक्की वाचा.
सर्वच शेतकरी जास्तीत जास्त उत्पादन कोणत्या सोयाबीनच्या वाणापासून मिळेल याच्या शोधात असतात. परंतु अनेक शेतकऱ्यांना कोणते वाण लावावे हे समजत नाही आणि ते रेगुलर वाण लावतात. आणि त्यांना कमी उत्पादन मिळते.
शेतकरी मित्रांनो आपल्या राज्यातील हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांसाठी खूपच फायद्याची माहिती सांगितली आहे. ते म्हणाले की तुम्ही सोयाबीनच्या या सुधारित वाहनांची पेरणी केली तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल. चला तर मग पेरणी योग्य सोयाबीनची वाण पाहुयात…
1) फुले संगम (KDS-726)
शेतकरी मित्रांनो मागील दोन-तीन वर्षात फुले संगम या वाहनाचा अतिशय वेगाने प्रसार होत आहे. त्याचबरोबर हा वाण तंबोरा रोगाला देखील प्रतिकारक आहे, त्याचबरोबर हे वाण पानावरील ठिपके आणि खोदमाशी या दोन्ही किडींना प्रतिकारक आहे. त्याचबरोबर या वाणाची पेरणी केल्यानंतर तुम्हाला केवळ 100 ते 105 दिवसात उत्पादन होईल. त्याचबरोबर या वाणापासून तुम्ही हेक्टरी 23 ते 25 क्विंटल उत्पन्न घेऊ शकता.soyabean news
2) फुले किमया (KDS – 753)
फुले किमया हे वाण तामिळनाडूमधील विद्यापीठाने 2017 साली प्रकाशित केले होते.(बाजारात आणले होते) त्यानंतर असे दिसून आले की या वाणावर देखील तांबोरा रोग कमी पडतो. त्याचबरोबर हे वाण कमी कालावधीत तब्बल 25 ते 30 क्विंटल पर्यंत उत्पादन देते. यामुळे तुम्ही या वाणाची लागवड करून देखील चांगले उत्पादन घेऊ शकता.
3) एम ए यु एस 612(MAUS-612)
एम ए यु एस या वाणाचा परिपक्व होण्याचा कालावधी केवळ 95 ते 100 दिवसाचा आहे. त्याचबरोबर हे वान देखील कीड आणि रोगाला सहनशील आहे. म्हणजेच या वाणावर कमी प्रमाणात किडीचा प्रादुर्भाव होतो त्याचबरोबर या वाणाच्या शेंगा लवकर तडकत नाहीत. अशी माहिती विद्यापीठाच्या शिफारशीत सांगितले आहे त्याचबरोबर हे वाण हार्वेस्टर नेम काढण्यासाठी देखील सरल आहे. त्याचबरोबर या वाणाची लागवड करून शेतकरी 24 ते 26 क्विंटलपर्यंत उत्पादन घेऊ शकतात…soyabean news