Soyabean Pik Vima: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज या बातमीमध्ये सोयाबीन पिक विमा बद्दल माहिती पाहणार आहोत. मित्रांनो सोयाबीनचा पिक विमा जमा होण्यास सुरू होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामातील शेती पिकाला खत तसेच खुरपण करण्यासाठी आर्थिक मदत मिळणार आहे.
आणि यामुळे शेतकरी चांगल्या प्रमाणात उत्पन्न घेऊ शकतील. कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा पिक विमा मिळणार आहे. याबद्दल सविस्तर माहिती आपण खालील प्रमाणे पाहुयात.
मित्रांनो नाशिक, जळगाव, नंदुरबार, धुळे, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, हिंगोली, अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, चंद्रपूर, नांदेड, परभणी आणि नागपूर या जिल्ह्यातील राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा केला जाणार आहे.Soyabean Pik Vima
पिक विमा योजनेचा फायदा कोणत्या शेतकऱ्यांना मिळतो?
ज्या शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे अतिवृष्टीमुळे नुकसान होते. आणि नुकसान झाल्यानंतर शेतकरी 72 तासाच्या आत पिक विमा कंपनीला नुकसानी बाबत माहिती देतो. त्या शेतकऱ्यांना पिक विमा दिला जातो. त्याचबरोबर इतर कोणत्याही नैसर्गिक संकटामुळे शेती पिकाचे नुकसान झाले तर शेतकऱ्याला पिकाची नुकसान भरपाई दिली जाते.
त्याचबरोबर शिंदे सरकारने आता पिक विमा योजना ही केवळ एक रुपयात राबविण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच शेतकरी पिक विमा केवळ एक रुपयात काढू शकतो. यामुळे शेतकऱ्यांना जास्त पैसे पिक विमा काढण्यासाठी लागत नाहीत..Soyabean Pik Vima