ST Bus News: नमस्कार मित्रांनो, शाळा महाविद्यालयातील शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना एसटीचा पास काढण्यासाठी पहिल्यांदा महामंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागत होता. मात्र आता शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना एसटीचा पास त्यांच्या शाळेत मिळणार आहे. अशी सूचना एसटी महामंडळाने प्रशासनाला दिली आहे.
त्याचबरोबर ही योजना 18 जून पासून एसटी प्रशासनातर्फे राबवण्यात येत आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या सत्रातील शाळा 15 तारखेपासून सुरू झालेल्या आहेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी होत असलेला त्रास शासनाने लक्षात घेतला आहे. आणि हा त्रास कमी करण्यासाठी लांब राहणाऱ्या विद्यार्थ्यांना एसटीच्या माध्यमातून 66% इतकी सवलत देऊन शाळेपर्यंत आणले जाणार आहे.
त्याचबरोबर विद्यार्थ्यांना या सवलतीचा लाभ घेण्यासाठी कोठेही जाण्याची गरज नाही. त्यांना त्यांच्या शाळेतच एसटी महामंडळाकडून पास योजनेचा लाभ दिला जाणार आहे. या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील सर्व बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे.
त्याचबरोबर मित्रांनो या योजनेचा संपूर्ण शासन निर्णय तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता…ST Bus News
येथे क्लिक करून पहा या योजनेचा शासन निर्णय