Viral Video: चालत्या बाईकवर सेल्फी काढणं पडलं महागात, एक जण जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी; लगेच पहा व्हायरल व्हिडिओ

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Viral Video: नमस्कार मित्रांनो, सध्या अनेकजण व्हायरल होण्यासाठी रेल्वे बनवून सोशल मीडियावर अपलोड करत आहेत. त्याचबरोबर अनेक जण पाण्याच्या ठिकाणी जीव जोखीम मध्ये टाकून व्हिडिओ बनवत आहेत. तर काहीजण चालत्या वाहनावर बसून व्हिडिओ बनवत आहेत. आणि या व्हिडिओच्या नादात अनेकांचा मोठा अपघात देखील झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तरीदेखील हे सूत्र बंद झालेले नाही काही दिवसांपूर्वीच एक तरुण व्हिडिओच्या नादात पाण्यात उडी मारून वाहून जातो.

असाच एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये आपल्याला दोन तरुण मोटार सायकलवर बसून चालले दिसत आहेत. त्याचबरोबर मागचा तरुण व्हिडिओ बनवत आहे. आणि पुढचा तरुण देखील व्हिडिओ कडे बघत आहे. पुढचा तरुण बराच वेळ गाडी कुठे जात आहे याकडे लक्ष देत नाही.Viral Video

आणि अचानक गाडी बाजूच्या कड्याला धडकते. आणि या कारणामुळे दोघेही खाली पडतात. त्याचबरोबर थोड्या वेळ व्हिडिओमध्ये काहीही दिसत नाही. त्यानंतर एक सायकल स्वार त्यांच्या मदतीला येतो. आणि त्यांना म्हणतो काय झाले? त्यावेळी व्हिडिओ बनवणारा व्यक्ती माझा पाय मोडला असं म्हणतो. त्यानंतर तो व्यक्ती जागेवर पडून रहा असे सांगतो.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

त्यावेळी पाय तुटलेला व्यक्ती त्याला म्हणतो की लय रक्त चालला आहे. आणि त्यावेळी सायकल वरील व्यक्ती म्हणतो धर हा गमजा बांध त्यावेळी जखमी झालेला व्यक्ती म्हणतो आता कसं बांधू माझा मोबाईल पण पडलाय मला घेता येईना.. त्यावेळी सायकलवरील व्यक्ती त्याला मोबाईल घेऊन देतो.. असा धक्कादायक व्हिडिओ तुम्ही खालील प्रमाणे पाहू शकता…Viral Video

Leave a Comment